
Central Railway : मुंबईकर रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची सूचना रविवारी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील उपनगरीय विभागात विविध अभियांत्रिकी व देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील उपनगरीय विभागात विविध अभियांत्रिकी व देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.(Special notice for Mumbaikars, there will be megablocks at these stations on Sunday …)
मुंबईतील CSMT स्थानकावरून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा व मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर सकाळी 10.18 ते दुपारी 3.36 वाजेपर्यंत वळवण्यात येणार आहेत व त्या गाड्या विद्याविहार, कांजूरमार्ग व नाहूर स्थानकांवर न थांबता मुलुंड येथे निश्चित केलेल्या धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येणार आहेत.
अप धीम्या मार्गावरील गाड्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान अपजलद मार्गावर ठाणे स्थानकावरून सकाळी 10.37 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत वळवण्यात येतील. तसेच या गाड्याही नाहूर, कांजूरमार्ग व विद्याविहार स्थानकांवर न थांबता, ती माटुंगा स्थानकावर निश्चित केलेल्या अप स्लो मार्गावर पुन्हा वळवण्यात येणार आहे. CSMT , वडाळा रोडवरून वाशी, बेलापूर, पनवेलसाठी सकाळी 11.34 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत आणि वांद्रे, गोरेगाव येथून सकाळी 9.56 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहेत.
पनवेल आणि कुर्ला येथून विशेष सेवा
सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल,बेलापूर, वाशीहून CSMT साठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव, वांद्रेहून CSMT साठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 10.45 ते दुपारी 4.58 वाजेपर्यंत बंद राहतील. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा चालवण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 या कालावधीत मेन लाईन व पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे.
Mega Block on 31.10.2021. pic.twitter.com/8LtFNXmrhw
— Central Railway (@Central_Railway) October 30, 2021
हे ही वाचा :