फेमस

Chhota Kashmir : म्हणून याला मुंबईतील छोटा काश्मीर म्हणतात;पहा काय आहे खास…

मुंबईच्या सर्व गर्दीपासून दूर असलेल्या आरे कॉलनीचा छोटासा हिरवा पट्टा आहे, ज्याला 'छोटा काश्मीर' असे म्हंटले जाते.

Chhota Kashmir :  मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे असे सर्वचजण म्हणतात, कारण ते त्याप्रमाणे आहे देखील, मुंबई हे जरी धावपळीचे शहर असले,तरी या शहरात मनोरंजक व निवांतपणे वेळ घालवण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणेही आहेत.  असच एक ठिकाण म्हणजे मुंबईच्या सर्व गर्दीपासून दूर असलेल्या आरे कॉलनीचा छोटासा हिरवा पट्टा आहे, ज्याला ‘छोटा काश्मीर’ असे म्हंटले जाते. येथे छोटा काश्मीर गार्डन व रस्त्याच्या पलीकडे एक तलाव देखील आहे. तलावामध्ये नौकाविहाराची सुविधा तसेच अनेक बॉलीवूड गाण्यांचे शूटिंग स्थान देखील आहे. हे भेट देण्यासाठी एक उत्तम पर्यटन स्थळ आहे.(That is why it is called Little Kashmir in Mumbai; see what is special …)

छोटा काश्मीर गार्डन

20211027 101020

येथील छोटा काश्मीर गार्डन आरे कॉलनी परिसरात विकसित केलेली ही एक रंगीबेरंगी बाग आहे. हे गार्डन विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांनी भरलेली आहे, जे वर्षभर सर्व ऋतूंमध्ये फुलतात. बागेतील सदैव हिरवीगार हिरवळ, नारळाची उंच झाडे व येथे उगवलेली सुंदर ताडाची झाडे आपल्याला काश्मीरच्या नैसर्गिक सौंदर्याची आठवण करून देतात. म्हणूनच या बागेला ‘छोटा काश्मीर’ म्हंटले जाते.

येथे अनेक बॉलिवूड चित्रपटांचे शूटिंग देखील होत असतात. या बागेत अनेक प्रकारचे पक्षी देखील वावरताना दिसतील, अनेक रंगबिरंगी फुलपाखरे ही आहेत. हे ठिकाण जरी मुंबईत असले तरी येथे तुम्हाला नक्कीच शांतता अनुभवायला मिळेल, येथे अनेक शाळेच्या सहली येत असतात.हे एक उत्तम पिकनिक स्टॉप आहे. आपण येथे आपल्या कुटुंबासोबत, प्रियजनांसोबत भेट देऊ शकता.

छोटा काश्मीर तलाव

20211027 100939

4 एकर परिसरात पसरलेला छोटा काश्मीर तलाव हा मुंबई शहराच्या आसपासचा एकमेव जलसाठा आहे. जिथे रोबोट व  पॅडलबोटी दोन्हीमध्ये बोटिंग करता येते. विशेषतः हे बोट राइडसाठी प्रसिद्ध आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 च्या दरम्यान बोट राइड्ससाठी येथे प्रवेश दिला जातो. तुम्ही 30 मिनिटे किंवा 50 मिनिटे या तलावात बोट राईडचा आनंद घेऊ शकता. पक्ष्यांचा किलबिलाट, ताजी हवा व शांत वातावरण तुमच्या बोट राईडमध्ये काही अतिरिक्त आकर्षण वाढवते. हे आठवड्याचे सर्व दिवस पर्यटकांसाठी खुले असते, तलावाचा परिसर त्याच्या स्थानामुळे खूप शांत आहे.

छोटा काश्मीर आठवड्याचे सर्व दिवस पर्यटकांसाठी खुले असते. येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रवेश दिला जातो.  बोट राइडच्या वेळा सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंतच आहे. उद्यानासाठी प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती 20 रुपये आहे. 30 मिनिटांच्या बोट राइडसाठी, तिकिटांची किंमत प्रति व्यक्ती 20 रुपये आहे. किंवा आता ती वाढवण्यातही आली असेल. मुंबईतील हे प्रसिद्ध छोटा काश्मीर आरे मिल्क कॉलनी, गोरेगाव ईस्ट येथे स्थित आहे.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments