आपलं शहरफेमस

Churchgate : मुंबईतील चर्चगेट स्टेशन, जाणून घ्या रंजक इतिहास…

चर्चगेट हे मुंबईच्या पश्चिम उपनगरी रेल्वेवरील एक टर्मिनस आहे.

Churchgate : मुंबईत अनेक प्रसिद्ध ठिकाण आहेत.हे तर सर्वानाच माहीत आहेत,परंतु मुंबईतील आणखीन एक प्रसिद्ध ,सर्वांच्याच उपयोगाचे व महत्वाचे म्हणजे मुंबईतील लोकल ट्रेन.मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वे हे ही तितकेच प्रसिद्ध आहेत.त्यापैकी एक म्हणजे मुंबईतील प्रसिद्ध स्थळ हे चर्चगेट आहे.जे पश्चिम रेल्वेचे महत्वाचे स्थानक मानले जाते.(Churchgate Station in Mumbai, Learn Interesting History …)

मुंबईत वाऱ्याच्या वेगाने धावणारी व दिवसरात्र प्रवाशांचा भार वाहून नेणारी लोकल सेवा गेल्या कित्येक वर्षांपासून अविरतपणे आपली सेवा बजावत आहे. गाव व शहर यांना जोडणारा हा सर्वोत्तम व स्वस्तातील मार्ग म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते.

मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे या दोन्ही मार्गावर प्रवास करतांना लोकल खचाखच गर्दीने भरुन जाते.मुंबईत स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईतील लोकल ही सर्वसामान्य माणसाची जननी मानली जाते.त्यापैकी चर्चगेट रेल्वे स्थानक हे आहे.चर्चगेट हे मुंबईच्या पश्चिम उपनगरी रेल्वेवरील एक टर्मिनस आहे.चर्चगेट क्षेत्र चर्चगेट रेल्वे स्थानकामुळे ओळखले जाते.हे पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय व मुंबईतील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक मानले जाते.

चर्चगेट -पश्चिम रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. ज्याप्रमाणे मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी स्थानक आहे. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट आहे. मुंबईतील प्रसिद्ध फ्लोरा फाऊंटनजवळ सेंट थॉमस कॅथड्रल नावाचे एक चर्च होते. त्या चर्चवरुनच या स्थानकाचे नाव चर्चगेट ठेवण्यात आले आहे.

या स्टेशनचे बांधकाम 1770 पर्यंत पूर्ण झाले आणि त्यास चर्चगेट स्टेशन असे नाव देण्यात आले.हे गेट 1860 मध्ये पाडण्यात आले. नंतर चर्चगेट रेल्वे स्थानक 1870 मध्ये पुन्हा बांधण्यात आले व 10 जानेवारी 1870 ला प्रथम चर्चगेट स्टेशनवरून रेल्वे धावली होती.

1931पर्यंत कुलाबा हे सर्वात दक्षिणेकडील स्टेशन होते.परंतु आता चर्चगेट हे शहराचे दक्षिणेकडील स्टेशन आहे. चर्चगेटच्या पलीकडील रेल्वे लाईन काढली गेली आणि चर्चगेट हे सर्वात दक्षिणेकडील स्टेशन बनले.पश्चिम रेल्वेचे अंतिम स्टेशन असणाऱ्या चर्चगेटला आज मान आहे. पण त्या आधी हा मान कुलाबा स्टेशनचा होता.

मुंबईतील चर्चगेट परिसर हे नेहमी खुले असते. येथे प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तुम्ही जर चर्चगेटला आजून एकदाही भेट दिली नसेल तर एकदा पर्यटक म्हणून त्याची विशेषता जाणून घेण्यासाठी नक्की भेट द्या.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments