बीएमसीहेल्थ

Corona Update : कोरोनावर मात कशी कराल, BMC कडून नेक्स्ट लेव्हल परिप्रेशन सुरू

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक ऑनलाईन शैक्षणिक सत्र सुरू केले आहे.

Corona Update :  बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) आरोग्य अधिकारी मुंबईत नगरसेवकांच्या मदतीने पुढील दोन आठवडे दररोज 100 सोसायट्यांसोबत कोरोनावर मात कशी करावी यासंबंधी ऑनलाइन बैठक आयोजित करण्यात येणार आहे. बैठकीच्या समाप्तीवर, संबंधित प्रतिनिधींना सर्व आवश्यक माहितीवर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन (PPT) दिले जाणार आहे.(How to Overcome Corona, Next Level Performance from BMC)

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) अधिकारी म्हणाले, की समित्यांचे अध्यक्ष किंवा सचिवांनी स्वतः पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन (पीपीटी) करण्याची गरज नाही, ते त्यांच्या मासिक पुनरावलोकनात तयार केलेल्या सादरीकरणाचा वापर करून रहिवाशांना कोरोनाबाबत जागरूक करू शकतात.

कोरोना व्हायरसच्या पहिल्या व दुसऱ्या लाटांच्या आकडेवारीच्या तपासणीनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. या आकडेवारीवरून असे आढळून आले की कोरोनाची प्रकरणे मुंबई शहरातील झोपडपट्ट्यांच्या तुलनेत उंच इमारतींमध्ये मोठ्याप्रमाणात आहेत. हे लक्षात घेऊन व संभाव्य तिसऱ्या लाटेचे अनुमान लक्षात घेऊन, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक ऑनलाईन शैक्षणिक सत्र सुरू केले आहे. जिथे प्रत्येक सोसायटींमधील 100 प्रतिनिधींना कोरोना संसर्गाबद्दल पुढील दोन आठवडे माहिती दिली जाईल,जी आवश्यक आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकाचे (BMC) असे म्हणणे आहे की,पावसाळ्यामध्ये मोठ्याप्रमाणात लोक आजारी पडतात.त्यामुळे या बैठकीद्वारे रहिवाशांना कोरोनाच्या लक्षणांविषयी जागरूकता निर्माण करणे हे आहे.मुंबई शहरात गेल्या महिनाभरात कोरोना रुग्णसंख्येत कोणतीही वाढ झालेली दिसत नाही.परंतु संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोकाही अजून संपलेला नाही.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments