
Diwali Guidelines :मुंबईसह संपूर्ण देशभरात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येत्या काही दिवसांत दिवाळी हा सण चालू होणार आहे, त्यामुळे लोक नवीन वस्तू, कपडे, कंदील व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची वाढती गर्दी पाहता कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने दिवाळीनिमित्त काही काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.(Announcement of Corona Rules for Diwali, Read Full Rules)
काय आहेत मार्गदर्शक तत्त्वे
दिवाळी साजरी करण्यासाठी नागरिकांनी मंदिरे व कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. हा सण घरीच साजरा करावा, ज्येष्ठ नागरिक व फटाक्यांच्या धुराच्या रुग्णांनी धुराच्या भीतीने फटाके फोडणे टाळावे, अशा सर्व प्रकारच्या कारणांसाठी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गृह विभागाने विविध मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कपडे, फटाके, दागिने व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी दुकाने तसेच मार्केटमध्ये गर्दी होत आहे. अशात कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दी कमी करण्याचे आवाहन केले आहे. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनी घराबाहेर पडणे टाळावे. मास्क लावून सुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळा. यासोबतच दिवाळीत मोठ्याप्रमाणात फटाके फोडले जातात. त्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणाची पातळी वाढते. त्याची खबरदारी घ्यावी.
फटाक्यांच्या धुरामुळे नागरिकांना मोठ्याप्रमाणात हृदयविकार व श्वासोच्छवासाचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फटाके टाळून दिवे लावून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक परिस्थितीनुसार स्थानिक पोलीस, प्रशासन व महापालिका दिवाळी साजरी करण्याचे नियम जाहीर करतील आणि ते नियम सर्वांसाठी बंधनकारक असतील, असे गृह विभागाच्या आदेशात म्हटले आहे.
हे ही वाचा :
- Hakone Entertainment Center : हाकोने मनोरंजन केंद्र ,येथे घेऊ शकता सर्व मजेदार राईट्सची मजा…
- Corona Vaccination : मुंबईतील सुमारे 10,000 गृहनिर्माण सोसायट्यांचे लसीकरण पूर्ण,अतिरिक्त महापालिका आयुक्त यांची माहिती…
- Mumbai Metro Update : BMC निवडनिकांपूर्वी मुंबईतील मेट्रो 2 ए चा पहिला टप्पा सुरू,पहा कुठपर्यंत आलं काम