आपलं शहरखूप काही

Document Renewal : वाहनचालकांना दिलासा देणारी बातमी,गाडीचे पेपर रिन्यूसाठी वाढवली तारीख

अशा सर्व वाहनांची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत वैध मानली जाणार आहे.

Document Renewal :  कोरोना महामारीमुळे सर्वत्र अजूनही गंभीर परिस्थिती आहे.तसेच देशातील नागरिक, वाहतूकदार व इतर विविध भागधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व समस्या लक्षात घेऊन सरकारने वाहनांसंबंधी 30 सप्टेंबर 2021 रोजी एक पत्र जारी केले आहे.हे पत्र मोटार वाहन कायदा, (मोटर वाहन) 1988 आणि केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 या कायद्यांतर्गत वाहनांशी संबंधित कागदपत्रांच्या वैधतेबाबत जारी करण्यात आले आहे.(Reassuring news to motorists, extended date for vehicle paper renewal)

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की फिटनेस, परमिट (सर्व प्रकार), ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी किंवा इतर कोणत्याही संबंधित दस्तऐवजाची वैधता, ज्यांची वैधता लॉकडाऊनमुळे वाढवता आली नाही. अशा सर्व वाहनांची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत वैध मानली जाणार आहे. या निर्णयामुळे अनेक वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे.

अंमलबजावणी अधिकाऱ्यांना अशी कागदपत्रे 31 ऑक्टोबर, 2021 पर्यंत वैध मानण्याचा सल्ला देण्यात आला आहे.यामुळे नागरिकांना वाहतुकीशी संबंधित सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

यासह, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने देखील हे स्पष्ट केले आहे, की हा शेवटचा विस्तार आहे, त्यानंतर वाहन वापरकर्त्यांना त्यांच्या संबंधित कागदपत्रांचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments