खूप काहीराजकारण

Election 2022 : 2022 च्या निवडणुकांपूर्वी BMC ने केली जोरदार तयारी,सत्ताधारी व विरोधी पक्षही निवडणुकांसाठी सज्ज…

राज्य निवडणूक आयोगाने या निर्णयाला सहमती दिल्यानंतर काम पुन्हा सुरू होणार आहे.

Election 2022 : 2022 मध्ये सर्वत्र निवडणुकांचा माहोल असणार आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकाने 2022 च्या निवडणुकांच्या  अगोदर व नागरी संस्थेने प्रशासन स्तरावर मतदार नोंदणी करणे, पुनर्रचना व अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे.(Before the 2022 elections, BMC has made strong preparations, the ruling and opposition parties are also ready for the elections …)

BMC ने निवडणुकीपूर्वी निवडणुकांच्या कामासंबंधी सर्व माहिती गोळा केली आहे. व राज्य निवडणूक आयोगाने या निर्णयाला सहमती दिल्यानंतर काम पुन्हा सुरू होणार आहे.

BMC ने  2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकांची तयारी अगदी जोरात सुरू केली आहे.  शहरातील सत्ताधारी पक्षाने जुने प्रकल्प, प्रलंबित प्रकल्प व इतर जे काही आवश्यक आहे. त्या सर्व इमारतींची चौकट व पुनर्बांधणी करण्यास सुरुवात केली आहे, तर विरोधी पक्ष पूर्ण ताकदीने भ्रष्टाचार, मनी लाँडरिंग व काय नाही, असा आरोप करत सत्ताधारी सरकारवर टीका आणि हल्लाबोल करत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (BMC) सध्याचा कार्यकाळ पुढील वर्षी मार्चमध्ये संपणार आहे.  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुका फेब्रुवारीमध्ये होतात, परंतु कोरोना महामारीच्या परिस्थितीमुळे व  राज्यात लागू होत असलेल्या लॉकडाऊनमुळे या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.  BMC ने नुकतेच मुंबई शहरातील 227 निवडणूक प्रभागांची सर्व माहिती गोळा करण्याचे काम देखील पूर्ण केले आहे.

महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष म्हणजेच शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी) यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीने (एमव्हीए) प्रभागांमध्ये सुधारणा करण्यास सांगितले आहे, ज्याच्या उत्तरात भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) एका नगरसेवकाने सांगितले की, 2011 च्या निवसणुकानंतरचा कोणताही नवीन डेटा नाही.  त्यामुळे निवडणूक प्रभागांमध्ये क्वचितच काही बदल करण्यात येतील.

हे ही वाचा :

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments