फेमस

Famous beach : मुंबईतील प्रसिद्ध ठिकाण गिरगाव चौपाटी;पहा का आहे आकर्षक

पूर्वी गिरगाव चौपाटी परिसरात कमी लोकवस्‍ती होती.सर्वत्र माडाची झाडे होती.

Famous beach :  मुंबई शहर हे अत्यंत महत्त्वाचे शहर मानले जाते.मुंबईमध्ये अशी असंख्य ठिकाणे आहेत,जी लोकप्रिय व आकर्षक आहेत. परंतु मुंबईतील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक म्हणजे गिरगाव चौपाटी. ही चौपाटी दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्हची रूपरेषा असलेले वालुकामय समुद्रकिनारा आहे.(Girgaon Chowpatty, a famous place in Mumbai; see why it is attractive)

गिरगाव चौपाटीच्या परिसरात रंगीबेरंगी दिवे, रस्त्यावरील खाद्यपदार्थांचा सुगंध, समुद्राच्या लाटांचा शांत आवाज आणि आकर्षक स्थानिक बाजारपेठ,यामुळे हे आणखी आकर्षक व सुंदर दिसते. गिरगाव चौपाटी ही आपल्याला देखणा समुद्र किनारा, गजबजलेला परिसर तरीही मनाला शांतता देणारे हे दृश्य अगदी दिवसभराचा थकवा काढून टाकते. आपल्या फॅमिलीबरोबर या ठिकाणाला तुम्ही कधी ही भेट देऊ शकता.

पूर्वी गिरगाव चौपाटी परिसरात कमी लोकवस्‍ती होती.सर्वत्र माडाची झाडे होती.परंतु इंग्रजांच्‍या दूरदृष्टीमुळे चौपाटीचा विकास व तिची भरभराट झाली. दीडदोनशे वर्षांपूर्वी हीच चौपाटी लकडी बंदर म्हणून ओळखली जात होती. गिरगाव चौपाटीवर पूर्वी सरपण, कौले, ताजे मासे, चुना अशा मालाची चढउतार होत असे, ही चौपाटी पूर्वी व्यापाराचे केंद्र होती.

गिरगाव चौपाटी ही राणीच्या गळ्यातील हार म्हणून ओळखली जाते.सर्वोत्तम मुंबई पर्यटन स्थळांमध्ये गणला जाणारा हा समुद्रकिनारा भव्य गणेश विसर्जन सोहळ्यांसाठी प्रसिद्ध आहे, जिथे गणपतीच्या विसर्जनासाठी असंख्य लोक गर्दी करतात. हा समुद्रकिनारा त्याच्या 10 दिवसांच्या राम लीला कामगिरीसाठी ओळखला जातो, ज्याच्या शेवटी रावणाचा पुतळा पेटवला जातो.

सकाळच्या वेळी या समुद्रकिनारी लोक व्यायाम करताना, धावताना किंवा समुद्राच्या हवेमध्ये फक्त श्वास घेताना दिसतात. जर तुम्हाला थोडा वेळ एकांतवासात घालवायचा असेल, तर किनाऱ्यावर हळूवार चालणे तुम्हाला नवीन उर्जा देते.समुद्राच्या किनारी बसून अथांग पसरलेला समुद्र पाहून मन शांत होत असतो.

गिरगाव चौपाटी फॅमिली पिकनिकसाठी एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे. फक्त आपल्या लहान मुलांना आपल्या नजरेत ठेवण्याची खात्री करा कारण समुद्रकिनाऱ्यावर नेहमी गर्दी असते. हे ठिकाण आनंददायी फेरी, फेरिस व्हील, गन शूटिंग गॅलरी, भविष्य सांगणारे आणि विक्रेते या चौपाटीवर आहेत.

गिरगाव चौपाटीचे मुख्य आकर्षण

या समुद्रकिनारी संध्याकाळी सूर्य मावळताना पाहणे,मजेदार उपक्रमांमध्ये गुंतणे, घोडे आणि उंटांवर स्वारी करणे, रस्त्यावरील कलाकारांची अद्भुत प्रदर्शने पाहणे,येथील स्ट्रीट फूड खूप लोकप्रिय आहे.येथे आजूबाजूच्या परिसरात अनेक प्रसिद्ध ठिकाणेही आपल्याला पाहायला मिळतात.

गिरगाव चौपाटी ही मुंबईतील क्वीन्स नेकलेस, मरिन ड्राइव्ह येथे आहे.येथे जाण्यासाठी कोणताच शुल्क आकारले जात नाही.तुम्ही येथे 24 तासातून कधीही जाऊ शकता.

 

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments