फेमस

Famous places in Mumbai : भेट द्या,मुंबईजवळील मनमोहक स्थळांना…

मुंबईमध्ये तर अशी खूप आकर्षक व प्रसिद्ध ठिकाणे पाहायला मिळतील, परंतु मुंबई शहराजवळच अशी काही मनमोहक ठिकाणं आहेत.

Famous places in Mumbai : मुंबई शहर हे व्यस्त शहर म्हणून ओळखले जाते, कारण मुंबईकरांची जीवनशैली नेहमी काम करणारी आहे.मुंबईकर आपल्या बिजी शेड्युल मधून थोडा वेळ काढून एखाद्या शांत ठिकाणी नेहमी फिरायला जात असतात.मुंबईमध्ये तर अशी खूप आकर्षक व प्रसिद्ध ठिकाणे पाहायला मिळतील, परंतु मुंबई शहराजवळच अशी काही मनमोहक ठिकाणं आहेत.जिथे तुम्ही तुमच्या सुट्टीचा दिवस अगदी आरामात आणि शांततेत घालवू शकता.मुंबईजवळील काही विकेंडची ठिकाणे अशी आहेत जिथे तुम्ही भेट देऊ शकता.

सिल्वासा

IMG 20211002 WA0016

सिल्वासा हे भारतीय केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेलीची राजधानी आहे. सिल्वासा शहर मुंबई शहरापासून 166 किमी अंतरावर वसले आहे.येथे हिरव्यागार पर्वतरांगा,सौंदर्याने नटलेले निसर्गरम्य वातावरण, पश्चिम घाट हे मनाला भावणार आहे. येथे वारली संस्कृतीचे निवासस्थान आहे. येथे अनेक उत्साहवर्धक जल क्रीडा उपक्रम आणि इतर ठिकाणे आपल्याला पाहायला मिळतील.

लोणावळा

IMG 20211002 WA0015

लोणावळा हे एक मोहक हिल स्टेशन आहे जे पुणे शहरापासून 65 किमी अंतरावर असून खंडाळा पासून 5 किमी अंतरावर आहे.लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. डोंगर, तलाव आणि धबधब्यांनी वेढलेले हे सुंदर ठिकाण ट्रेकर्स व साहसी पर्यावरणप्रेमींना आकर्षक करते,हे ठिकाण त्यांच्यासाठी स्वर्ग आहे. येथील स्वादिष्ट चिक्की किंवा चॉकलेट फज खाल्ल्याशिवाय कोणीही लोणावळ्याहून परत जात नाही.

अलिबाग

IMG 20211002 WA0013

अलिबाग हे एक लहान समुद्र किनारपट्टीचे शहर आहे.हे शहर महाराष्ट्राच्या कोकण भागात वसले आहे.जे मुंबईपासून 95 किमी अंतरावर आहे. आलिबागमध्ये ऐतिहासिक किल्ले, वालुकामय किनारे व नारळाची मोठमोठी झाडे पाहायला मिळतील, या वातावरणात आपले मन अगदी शांत होऊन जाते. आलिबागमध्ये नव्याने सुरू झालेली रो-रो सेवा दोन आणि चार चाकी वाहनांना घेऊन जाते.या निसर्ग व किनारपट्टी लाभलेल्या स्थळाला अनेक पर्यटक भेट देत असतात.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments