आपलं शहरखूप काहीफेमस

Flora Fountain : फ्लोरा फाऊंटनचे नाव हुतात्मा चौक का करण्यात आले, पहा संपूर्ण कहाणी…

मुंबईच्या फोर्ट भागातील डेव्हीड ससून यांच्या मालकीच्या जागेवर इ.स.1864 साली एक कारंजे बांधण्यात आले.

Flora Fountain : मुंबईत आजवर तुम्ही अनेक प्रेक्षणीय स्थळे पहिली असतील,परंतु तुम्ही मुंबईतील या प्रसिद्ध स्थळाला भेट दिली आहे का?मुंबईच्या फोर्ट भागातील डेव्हीड ससून यांच्या मालकीच्या जागेवर इ.स.1864 साली एक कारंजे बांधण्यात आले. हे मुंबईतील सर्वात गजबजलेल्या भागात असलेले अतिशय सुंदर अशा या कारंज्यांचे एका पयर्टनस्थळातच रुपांतर झाले आहे.(Why Flora Fountain was named Hutatma Chowk, see full story …)

मुंबईतील या करंज्याचे नाव फ्लोरा फाऊंटन असे आहे,तर सुरुवातीचे मुंबईचे गव्हर्नर सर बार्टल फ्रेरे यांच्या नावावर या कारंज्याचे नाव ठेवण्यात आले होते, परंतु 1864 मध्ये कारंजेच्या उद्घाटनापूर्वी,रोमनमधील समृद्धी देवतेच्या नावावर या कारंज्याला ‘फ्लोरा’ हे नाव देण्यात आले. फ्लोरा फाउंटन त्याच ठिकाणी उभारण्यात आला आहे. जिथे बॉम्बे किल्ल्याचा मूळ चर्चगेट उभा होता. मुंबईतील फ्लोरा फाऊंटन 150 वर्षांपेक्षा जुने आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पोलिसांच्या गोळीबारात या परिसरात 105 सदस्य  मुत्युमुखी पडले. त्यांची आठवण म्हणून 1960 मध्ये  या ठिकाणी मशाल धारण केलेल्या देशभक्तांसह आणखी एक दगडी रचना, कारंजाजवळ बांधण्यात आली.तेव्हा पासून या परिसराचे हुतात्मा चौक असे नामकरण करण्यात आले.

फ्लोरा फाऊंटनची रचना आर नॉर्मन शॉ यांनी तयार केली होती. फ्लोरा फाऊंटन हे जेम्स फोर्सिथने आयात केलेल्या पोर्टलँड दगडापासून बनवले आहे.व हे पांढऱ्या तेलाच्या पेंटने लेपित आहे. रोमन देवीची भव्य मूर्ती संरचनेच्या शीर्षस्थानी स्थापित केली आहे, ज्यामुळे कारंजेची इमारत आणखी सुंदर दिसते.येथील आकर्षकता पाहण्यासाठी तुम्ही फ्लोरा फाऊंटनला एकदा नक्की भेट द्या.मुंबईतील इतर वास्तूंपैकी ही वास्तूही तितकीच प्रेक्षणीय आणि सुंदर आहे.

फ्लोरा फाऊंटन हे मुंबईच्या वीर नरिमन रोड, महात्मा गांधी रोड, काळा घोडा, किल्ला येथे स्थित आहे.येथे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. तुम्ही येथे कधीही भेट देऊ शकता.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments