
Goddess Mumba : मुंबईत अनेक प्राचीन देवस्थाने आहेत.असच मुंबईतील एक प्राचीन मंदिर म्हणजे मुंबादेवी मंदिर हे आहे.हे मंदिर सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे.असे मानले जाते की, मुंबई शहराला मुंबा देवीचे नाव देण्यात आले आहे.मुंबा देवीचे हे भव्य प्राचीन मंदिर झवेरी बाजारच्या गर्दीच्या गल्ल्यांमध्ये आहे,या प्राचीन देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्यासंख्येने लोक येत असतात.मुंबादेवी ही कोळीसमाजाची पालक देवता मानली जाते.(Palan Harta Mumbai Devi in Mumbai; see what is history …)
नवरात्रोत्सवात देवीचे मंदिर आकर्षक फुलांनी व रोषणाईने सजवले जाते.नवरात्रीमध्ये नऊ दिवस या मंदिरात अनेक भाविक दर्शनासाठी मोठ्यासंख्येने गर्दी करत असतात.नवरात्रोत्सवात संपूर्ण मुंबा देवीचा परिसर गजबजलेला असतो.नवरात्रोत्सव मुंबादेवी मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.7 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातील मंदिरे देवीच्या स्थापनेच्या शुभ मुहूर्तावर खोलण्यात येणार आहेत.तर भाविकांना मुंबा देवीचे दर्शनही प्रत्यक्षात घेता येणार आहे.
मुंबा देवीचा इतिहास
मुंबईतील हे एक प्रसिद्ध प्राचीन मंदिर आहे. जे मुंबादेवी ला समर्पित आहे. हे सुंदर मंदिर मुंबईच्या मध्यभागी असून हे मंदिर 18 व्या शतकात बांधले गेले आहे. असे मानले जाते की मुंबादेवी मंदिर प्रथम 1675 मध्ये बोरीबंदर येथे बांधण्यात आले होते.परंतु ते मंदिर नष्ट झाले.व पुन्हा हे मंदिर 1737 साली भुलेश्वर परिसरातील झवेरी बाजार येथे 1737 मध्ये मुंबादेवी मंदिराची स्थपना कोळी बांधवांनी पुन्हा केली.प्राचीन काळापासून कोळी (मच्छीमार) आणि द्रविड लोक मुंबादेवीला मोठ्या भक्तिभावाने प्रार्थना करत असतात.
मुंबा देवी मंदिराला हे सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत खुले असते.मुंबा देवी मंदिर मंगळवार ते रविवार वर्षभर खुले असते.फक्त सोमवारी मंदिर बंद ठेवले जाते,परंतु सणाच्या वेळी हे मंदिर भाविकांसाठी सोमवारी ही खुले ठेवले जाते. सोमवार वगळता हे वर्षभर खुले असते. मुंबा देवीची आरती सकाळी 7 आणि संध्याकाळी 7 वाजता होत असते.मुंबा देवी मंदिरात जाण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही.मंदिराला मिळालेल्या देणगीतून मंदिरातील ट्रस्ट मंदिराची देखभाल करत असतात.
हे ही वाचा :