खूप काही

Government job : महाराष्ट्र महिला बाल विकास विभागात नोकरीची संधी,पहा कसा कराल अर्ज…

त्या अधिसूचनेप्रमाणे महाराष्ट्र महिला बाल विकास विभागात 138 जागांसाठी पदभरती होणार आहे.

Government job : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल,तर तुम्हाला एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.महाराष्ट्र महिला बाल विकास विभागात काही पदांसाठी भरती होणार आहे,तर या पदांसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता.महाराष्ट्र महिला बाल विकास विभागातर्फे एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्या अधिसूचनेप्रमाणे महाराष्ट्र महिला बाल विकास विभागात 138 जागांसाठी पदभरती होणार आहे.(Job opportunities in Maharashtra Women and Child Development Department, see how to apply …)

महाराष्ट्र महिला बाल विकास विभागात अध्यक्ष (Chairman) व सदस्य (Member) या दोन पदांसाठी भरती होणार असून या पदांसाठी एकूण 138 जागा रिक्त आहेत.इच्छुक उमेदवारांनी यासाठी लवकरात लवकर अर्ज करावे,कारण या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2021 ही आहे.

शैक्षणिक पात्रता ,अनुभव आणि वयोमर्यादा

या पदांसाठी पात्र उमेदवाराचे शिक्षण हे बालमानशास्त्र, मनोविकृती शास्त्र, समाजशास्त्र, समाज, मानवी आरोग्य याविषयांच्या कोणत्याही शाखेमध्ये शिक्षण घेतलेले असावे. तसेच संबंधित विषयांमध्ये उमेदवारांना अनुभव असणे आवश्यक आहे. सबंडजीट विषयांमध्ये व्यावसायिक कार्य करणाऱ्या उमेदवारांनाही या विभागामध्ये नोकरीची संधी देण्यात येणार आहे.उमेदवारांना अर्ज करतेवेळी वयोमर्यादेची अट ठेवली नाही.मग उमेदवार कोणत्याही वयाचा असो ते या पदांसाठी अर्ज करू शकतात.

या पदांसाठी काही महत्त्वाचे नियम

या पदांसाठी अर्ज करतावेळी उमेदवाराने पुढील नियम पाहावे,या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कोणत्याही राजकीय पक्षांशी संबंध नसावेत.उमेदवार ज्या जिल्ह्यात राहत आहे,त्याच जिल्ह्यांसाठी उमेदवारांनी अर्ज करावे.उमेवारांनी निवडप्रक्रियेपूर्वी पोलीस स्टेशनमधून प्राप्त होणारे चारित्र्य प्रमाणपत्रं सादर करणे आवश्यक आहे.यापूर्वी सादर करण्यात आलेल्या जाहिरातीच्या आधारे ज्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही.

महाराष्ट्र महिला बाल विकास विभाग या पदांसाठी पात्र उमेदवाराने जिल्ह्यांच्या महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालय या पत्त्यावर आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2021 ही आहे.तसेच या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.maharashtra.gov.in/1125/Home या लिंकवर क्लिक करा.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments