खूप काहीहेल्थ

Health News : मुंबईत मलेरिया, डेंग्यू व चिकनगुनियासारख्या आजारांमध्ये वाढ; पहा काय आहे BMC चे नियोजन

मुंबईमध्ये  डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनियासारख्या पावसाळ्याशी संबंधित आजारांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

Health News : मुंबईसह देशभरात अद्याप कोरोना महामारीचे  संकट टळला नाही,त्यात आता मुंबईमध्ये  डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनियासारख्या पावसाळ्याशी संबंधित आजारांमध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून काही भागांमध्ये पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने सर्वत्र थंडीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Increase in diseases like malaria, dengue and chikungunya in Mumbai;  See what BMC’s planning is)

एका अहवालानुसार मुंबईमध्ये 10 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान मलेरियाचे 143, डेंग्यूचे 57 व चिकनगुनियाच्या 4 केसेस  नोंदवण्यात आल्या आहेत. यापैकी बऱ्याच रुग्णांची संख्या एकट्या बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) द्वारे चालवल्या जाणार्‍या आरोग्य केंद्रांमध्ये नोंदवली गेली आहेत.

एडिस इजिप्टाई डासाने पसरलेला चिकनगुनिया हा आजार जवळपास दोन वर्षांनी परत आला आहे. शहरात आतापर्यंत ऑक्टोबरमध्ये चिकनगुनियाचे 19 रुग्ण आढळले आहेत, तर सप्टेंबरमध्ये 7 केसेसची  नोंद झाली आहे.  आतापर्यंत ऑक्टोबरमध्ये 154 डेंग्यू रुग्णांवर BMC रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

कोरोना महामारीमुळे मलेरिया व डेंग्यूच्या चाचणीत घट झाल्याचे दिसते.  याची पुष्टी करताना, BMC च्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे अनेक रुग्ण त्यांच्या तपासणीसाठी रुग्णालयात पोहोचू शकले नाहीत. तर एका खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, पावसाळ्यात खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जास्त असते, पण गेल्या काही आठवड्यात ती कमी झाल्याचे दिसते, परंतु हिवाळ्यात मलेरिया, डेंग्यूसारख्या  रुग्णसंख्येमध्ये  वाढ होऊ शकते.

BMC च्या एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले की, BMC ने या संसर्गजन्य रोगांवर उपचार करण्यासाठी आरोग्य केंद्रे व रुग्णालयांमध्ये पुरेशी व्यवस्था केली आहे. गेल्या महिन्यात, जुलैमध्ये आजारांची वाढती संख्या पाहता, BMC ने डेंग्यू, मलेरिया व पावसाळ्यात होणाऱ्या इतर आजारांवर उपाययोजना करत असल्याचे वृत्त आले होते.

बुधवार 20 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्यास व मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया सारख्या आजारांचा प्रसार रोखण्यास सांगितले आहे.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments