
IAAD Recruitment 2021 : IAAD भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागातर्फे एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्या अधिसूचनेत भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग गट ‘क’ मध्ये लेखा परीक्षक,लेखपाल, लिपिक,डीईओ-ग्रेड-ए पदांसाठी एकूण 199 जागांसाठी भरती निघाली आहे.पात्र उमेदवाराने अर्जाची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने करावी.इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी,कारण अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2021 ही आहे.(Indian Audit and Accounts Department Recruitment, see how to apply)
शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा
लेखा परीक्षक,लेखापाल या पदांसाठी एकूण 125 जागा रिक्त असून उमेदवाराचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून झालेले असावे.तर लिपिक, डीईओ-ग्रेड-ए या पदासाठी एकूण 74 जागा रिक्त आहेत.यासाठी उमेदवाराचे शिक्षण मान्यताप्राप्त बोर्ड,विद्यापीठातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समक्ष असणे आवश्यक आहे.तसेच या पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 27 या दरम्यान असावे,SC व ST कास्टसाठी 5 वर्षे सूट असणार आहे,तर OBC साठी 3 वर्षे सूट देण्यात आली आहे.
IAAD साठी उमेदवारांकडून परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही,तर या पदांसाठी उमेदवाराचे वेतन 5,200 ते 20,200रु पर्यंत असू शकते.नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे.पात्र उमेदवाराने या पदांसाठी ऑफलाईन अर्ज करावा.अंतिम तारीख 12 नोव्हेंबर2021 ही देण्यात आली आहे.या पदांसाठी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील वेबसाईटला भेट द्या. www.cag.gov.in तसेच अर्ज पाठवण्याचा पत्ता IAAD ने दिलेल्या जाहिरातीत दिला आहे.
हे ही वाचा :