खूप काही

IBPS Recruitment 2021 : IBPS मार्फत विविध पदांसाठी भरती;पहा काय आहे प्रक्रिया…

ग्रॅज्युएशन (पदवी) पूर्ण झालेल्या तरुणांसाठी बँकेत नोकरी मिळविण्याची एक सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.

IBPS Recruitment 2021 :  तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? तर तुम्हाला बँकेत नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध आहे. ग्रॅज्युएशन (पदवी) पूर्ण झालेल्या तरुणांसाठी बँकेत नोकरी मिळविण्याची एक सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन IBPS मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. IBPS मार्फत 4135 जागांसाठी मेगा भरती होणार आहे. प्रोबेशनरी ऑफिसर किंवा मॅनेजमेंट ट्रेनीच्या पदांसाठी ही भरती होणार आहे.(Recruitment for various posts through IBPS; see what is the process …)

बँक ऑफ इंडिया मध्ये 588 जागांवर भरती होणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र 400, कॅनरा बँक 650, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 620, इंडियन ओव्हरसीज बँक 26, पंजाब आणि सिंध बँक 427, यूको बँक 440, तर युनियन बँक ऑफ इंडिया 912 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपल्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी,अर्ज करण्याची सुरुवात 20 ऑक्टोबर 2021 रोजी सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2021 ही देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी IBPS, ibps.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे.

शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा

भारत सरकारच्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (पदवी) किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 20 ते 30 वर्षा दरम्यान असावे.

अर्ज शुल्क व निवड प्रक्रिया

सामान्य व ओबीसी कास्टमधील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 850 रुपये,तर SC, ST, PWBD कास्टच्या उमेदवारांना 175 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहेत.

उमेदवारांची निवड IBPS PO परीक्षा 2021 च्या तीन टप्प्यांमध्ये त्यांच्या कामगिरीच्या आधारे केली जाणार आहे. IBPS PO ही प्रारंभिक परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये ही परीक्षा होणार आहे. या पदांसाठी  52,000 ते 55,000 इतके वेतन पात्र उमेदवाराला भेटणार आहे.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments