खूप काही

Indian Navy : भारतीय नौदलात नोकरीची संधी; पहा किती जागा रिक्त…

भारतीय नौदलात विविध पदांसाठी एकूण 2500 जागांसाठी भरती होणार आहे.

Indian Navy : तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? तर भारतीय नौदलात नोकरीची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय नौदलात विविध पदांसाठी एकूण 2500 जागांसाठी भरती होणार आहे. इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर आपल्या अर्जाची प्रकिया पूर्ण करावी,कारण अर्ज करण्याची सुरुवात 16 ऑक्टोबर 2021 पासून सुरू झाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 ही आहे.(Job opportunities in the Indian Navy; See how many seats are vacant …)

भारतीय नौदलात सेलर (AA) पदासाठी एकूण 500 जागांवर भरती करण्यात येणार आहे, तर सेलर (SSR) या पदाच्या एकूण 2000 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सदर नोकरीत उमेदवाराच्या वयाची अट, जन्म 01 फेब्रुवारी 2002 ते 31 जानेवारी 2005 दरम्यान असावे.

शैक्षणिक पात्रता

सेलर (AA) पदासाठी उमेदवाराचे शिक्षण 60% गुणांसह 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर सेलर (SSR) या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण 12वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण असावे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे. भारतीय नौदलात भरती होताना कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

सुरुवातीच्या चाचणी कालावधीत, नाविकांना दरमहा 14,600 रुपये स्टायपेंड म्हणून वेतन मिळेल. तर चाचणी पूर्ण झाल्यानंतर, संरक्षण पे मॅट्रिक्सच्या लेव्हल 3 (21,700 ते 69,100 रुपये) वेतन मिळणार आहे.

भारतीय नौदलात पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 25 ऑक्टोबर 2021 ही अंतिम तारीख त्यासाठी देण्यात आली आहे. भारतीय नौदल या पदाच्या अधिक माहितीसाठी www.indiannavy.nic.in या लिंकवर क्लिक करा.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments