खूप काही

IOCL Recruitment 2021 : IOCL मध्ये विविध पदांसाठी भरती;पहा किती जागा रिक्त

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) येथे रिफायनरी युनिटमध्ये  विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

IOCL Recruitment 2021 : तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? तुमच्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) येथे रिफायनरी युनिटमध्ये  विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार येथे अप्लाय करू शकतात. उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. येथे एकूण 1968 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.(Recruitment for various posts in IOCL; see how many vacancies)

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 22 ऑक्टोबर 2021 पासून सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख  12 नोव्हेंबर 2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. पात्र उमेदवारांनी  iocl.com वर  ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज भरायचे आहेत.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

1) ट्रेड अप्रेंटिस या पदासाठी उमेदवाराचे शिक्षणB.Sc (फिजिक्स,मैथ्स,केमिस्ट्री,इंडस्ट्रियल केमिस्ट्री) , 10वी उत्तीर्ण व ITI (फिटर) B.A., B.Com. मधून झालेले असावे.

2) टेक्निशियन अप्रेंटिस या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण केमिकल,रिफायनरी व पेट्रो-केमिकल,मेकॅनिकल,डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

3) डाटा एंट्री ऑपरेटर, डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

या पदांसाठी उमेदवाराचे वय 18 ते 24 वर्षे असावे, SC,ST कास्टसाठी 05 वर्षे सूट असेल,तर OBC कास्टसाठी 03 वर्षे सूट असणार आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे. परीक्षेची तारीख 21 नोव्हेंबर 2021 ही आहे ,कोणत्याही प्रकारची परीक्षा फी आकारली जाणार नाही. उमेदवार आपले प्रवेशपत्र 16 नोव्हेंबर 2021 ते 20 नोव्हेंबर 2021 पर्यंत डाउनलोड करू शकतात.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments