खूप काही

Jio-BP petrol pump : मुंबईमध्ये जिओ-बीपीचे पहिले पेट्रोल पंप;पहा काय आहे योजना…

तर ते मुंबई जवळ पहिले जिओ-बीपीचे पेट्रोल पंप उघडणार आहेत.

Jio-BP petrol pump : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ग्लोबल एनर्जी सुपर मेजर बीपी पीएलसी मुंबईजवळील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भागीदारीत त्यांचे पहिले ‘जिओ-बीपी’ ब्रँडेड पेट्रोल पंप उघडणार आहे. अशी माहिती कंपनीने दिली.(Jio-BP’s first petrol pump in Mumbai; see what’s the plan …)

2019 मध्ये, BP ने रिलायन्सच्या मालकीच्या 1400 पेक्षा जास्त पेट्रोल पंप व 31 एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) स्टेशन मध्ये 49 टक्के भागभांडवल 1 अब्ज अमेरिकन डॉलर मध्ये खरेदी केले होते. रिलायन्सचे विद्यमान पेट्रोल पंप त्यानंतर रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड या संयुक्त उपक्रमाकडे देण्यात आले.

BP चे मुख्य कार्यकारी बर्नार्ड लुनी व्हिडीओ लिंकवरून CERAWeek च्या वतीने इंडिया एनर्जी फोरममध्ये बोलताना म्हणाले की, 2025 पर्यंत पेट्रोल पंपांची संख्या 5,500 पर्यंत नेण्याची योजना आहे. तसेच ते म्हणाले, आमच्याकडे सुमारे 1500 साइट्स (पेट्रोल पंप) आहेत जे परंपरेने रिलायन्स साइट्स होत्या परंतु आता त्या जिओ-बीपी साइट बनल्या आहेत. तर ते मुंबई जवळ पहिले जिओ-बीपीचे पेट्रोल पंप उघडणार आहेत.

रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड (RBML) मध्ये उर्वरित 51 टक्के भागधारक आहेत. तर परिवहन इंधनासाठी RBML ला आधीच विपणन प्राधिकरण प्राप्त झाले आहे. रिलायन्सने विद्यमान पेट्रोल पंप ताब्यात घेतल्यानंतर, संयुक्त उपक्रमाने इंधन व कॅस्ट्रॉल स्नेहक विक्री सुरू केली आहे. येत्या काळात आउटलेट्सचे नावही ‘जिओ-बीपी’ असणार आहे.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments