खूप काही

Job opportunities : पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी;पहा कोणत्या पदावर भरती…

या अधिसूचनेनुसार,अभियंता व केमिस्ट या पदावर भरती होणार आहे.

Job opportunities :  तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर तुम्हाला महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी मिळू शकते,कारण महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडने विविध पदांच्या भरतीसाठी एक अधिसूचना जारी केली आहे.या अधिसूचनेनुसार,अभियंता व केमिस्ट या पदावर भरती होणार आहे.(Job Opportunity in Power Generation Company Limited; See which position to recruit …)

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण 38 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.या पदांमध्ये अभियंता – 11 पदे भरली जाणार आहेत,तर केमिस्ट – 27 पदांवर भरती केली जाणार आहे.या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 23 सप्टेंबर 2021 पासून सुरू झाली आहे.उमेदवारांनी पदांसाठी नोंदणीकृत पोस्टद्वारे अर्ज करावे.

शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा

अभियंता पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे. तर केमिस्ट पदांसाठी उमेदवाराकडे BSC रसायनशास्त्र किंवा MSC रसायनशास्त्र पदवी असणे आवश्यक आहे.या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

या पदांसाठी उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.उमेदवार त्यांचे अर्ज सहाय्यक महाव्यवस्थापक (HR-RC), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड, एस्ट्रेला बॅटरीज विस्तार कंपाऊंड, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई 400019 वर पाठवू शकतात.

उमेदवाराने आपली अर्ज प्रक्रिया लवकर सुरू करावी कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख 15ऑक्टोबर 2021 ही आहे.उमेदवार त्यांचे अर्ज पुढील अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in करू शकता.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments