फेमस

Kamla Nehru Park : मुंबईतील प्रसिद्ध कमला नेहरू पार्क, का आहे आकर्षक…

तसेच कमला नेहरू उद्यान 'ओल्ड वूमन्स शू' साठीही प्रसिद्ध आहे.

Kamla Nehru Park : मुंबईतील प्रेक्षणीय व लोकप्रिय स्थळांना तुम्ही अनेकदा भेट दिली असेल,परंतु मुंबईतील कमला नेहरू पार्कला तुम्ही कधी भेट दिली आहे का? कमला नेहरू पार्कची विविध वैशिष्ट्ये आहेत. कमला नेहरू पार्क हे मुंबईतील हँगिंग गार्डन कॉम्प्लेक्सचाच एक भाग आहे. हे एक मनोरंजनाचे मैदान म्हणु ओळखले जाते. कमला नेहरू पार्क जवळपास 4 एकर जमीन क्षेत्रात पसरलेले आहे. कमला नेहरू पार्क पर्यटकांमध्ये व मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहे, ज्यांना येथे येऊन शहराच्या निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेणे आवडते.(Mumbai’s famous Kamla Nehru Park, why is it attractive …)

कमला नेहरू पार्क या ठिकाणाहून सर्वात लक्षणीय ‘क्वीन्स नेकलेस’ म्हणजेच मरीन ड्राइव्ह चे भव्य दृश्य पाहायला मिळते. या बागेत, बूटांची एक उल्लेखनीय रचना आहे, जी मुलांचे लक्ष वेधून घेते. तसेच कमला नेहरू उद्यान ‘ओल्ड वूमन्स शू’ साठीही प्रसिद्ध आहे. या शूची रचना बीएमसीचे माजी पर्यावरण अधिकारी सोली आर्सेवाला यांनी केली होती.

अनेकांना त्याबद्दल माहिती नाही, परंतु बूटांच्या संरचनेला ऐतिहासिक प्रासंगिकता आहे. तेथे एक वृद्ध स्त्री होती. ती वृद्ध स्त्री शूजमध्ये राहत होती.असे मानले जाते. शूची रचना नर्सरी कवितेपासून प्रेरित आहे.

कमला नेहरू उद्यानाचे 2017 ते 2018 मध्ये नूतनीकरण करण्यासाठी बंद करण्यात आले होते. नंतर ते 22 फेब्रुवारी 2018 रोजी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. उद्यानात आता मुलांच्या आनंदासाठी अनेक अतिरिक्त जागा आहेत. नूतनीकरण केलेल्या शूची रचना आता निळ्या रंगात रंगवलेली आहे, इंद्रधनुष्य अँफीथिएटर आहे, लटकलेल्या उसाच्या खुर्च्या असलेला पेर्गोला, इको गॅझेबॉस, कंपास व्ह्यू गॅलरी, मिनिन्स सेल्फी पॉइंट, तिरंगा प्लांटर बेडसह अशोक स्तंभ व एक घड्याळ ठेवण्यात आला आहे.

कमला नेहरू पार्क मलबार हिल्स मध्ये आहे. हे उद्यानाचे अचूक स्थान BG Kher Rd, Malabar Hills, Mumbai येथे स्थित आहे.हे उद्यान सकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत पर्यटकांसाठी खुले असते.तुम्ही या पार्कला कधीही भेट देऊ शकता.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments