खूप काहीटेक

Kushinagar Airport : कुशीनगर विमानतळ – मुंबई, दिल्ली,कोलकाता फ्लाइटचे वेळापत्रक जाहीर, पहा कशी असेल उड्डाण व्यवस्था…

कुशीनगर विमानतळावरून दिल्ली-मुंबई आणि कोलकाता फ्लाइटचे वेळापत्रकही जारी करण्यात आले आहे.

Kushinagar Airport : कुशीनगर विमानतळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्घाटनानंतर ही विमानवाहतुक प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. एका ताज्या अहवालानुसार कुशीनगर विमानतळावरून दिल्ली-मुंबई आणि कोलकाता फ्लाइटचे वेळापत्रकही जारी करण्यात आले आहे.(Kushinagar Airport – Mumbai, Delhi, Kolkata flight schedule announced, see how the flight system will be …)

कुशीनगर ते दिल्ली ही विमानसेवा 26 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे, तर कोलकाता व मुंबईसाठी हीच विमानसेवा 18 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तसेच स्थानिक विमानतळानेही यासाठी मंजुरी दिली आहे. यासह,अनेक मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली गेली आहेत.

सोमवार, बुधवार, शुक्रवार व रविवारी कुशीनगर विमानतळावरून दिल्लीसाठी उड्डाणे उपलब्ध असणार आहेत. तर कुशीनगर ते मुंबई हे विमान आठवड्यातून तीन दिवस प्रवाशांना उपलब्ध असेल, त्याचबरोबर कोलकात्याला जाणारी विमानेही आठवड्यातून तीन दिवस उपलब्ध असणार आहेत.

दिल्ली-मुंबई आणि कोलकाता फ्लाइटचे वेळापत्रक?

दिल्लीहून एसजी-2987 दुपारी 12 वाजता उड्डाण करणार आहे,तर दुपारी 1.35 वाजता ते विमान कुशीनगर विमानतळावर पोहोचेल. एसजी -2988 कुशीनगर येथून 1.55 वाजता उड्डाण घेत ते दुपारी 3.50 वाजता दिल्लीला पोहोचेल.

कुशीनगरहून एसजी-131 दुपारी 3.15 वाजता उड्डाण करेल आणि संध्याकाळी 6 वाजता मुंबई विमानतळावर पोहोचेल. कुशीनगर येथून एसजी -4039 दुपारी 3.25 वाजता सुटेल आणि 5.25 वाजता कोलकाता येथे पोहोचेल.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments