आपलं शहरलोकल

Local Train Update : लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना मुंबई लोकलने प्रवास;लोकलचे नवे नियम

ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत ते सर्व नागरिक लोकल ट्रेनमध्ये प्रवास करू शकणार आहेत.

Local Train Update :मुंबई शहराची लाईफलाईन म्हंटली जाणारी मुंबई लोकल ट्रेन आता सर्व मुंबईकरांसाठी खुली झाली आहे.  महाराष्ट्र सरकारने मंगळवारी जाहीर केले की ज्यांनी कोरोना लसीकरण पूर्ण केले आहे, म्हणजेच ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत ते सर्व नागरिक लोकल ट्रेनमध्ये प्रवास करू शकणार आहेत.(Citizens who have completed vaccination travel by Mumbai local; new local rules)

सध्या लोकल ट्रेनला दैनंदिन तिकिटांऐवजी मासिक पास दिले जात आहेत, त्यामुळे गाड्यांमध्ये गर्दीही कमी राहते. पण आता 28 ऑक्टोबरपासून लोकल गाड्या 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र सरकारने यापूर्वी  15 ऑक्टोबर रोजी लोकल ट्रेनमधील प्रवास व विशेष सुविधांशी संबंधित नियमांमध्ये बदल केले होते.  त्यानंतर 18 वर्षांखालील शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही मुंबईत लोकल ट्रेनमधून प्रवास करू देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

सरकारच्या आदेशानुसार, कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व त्यानंतर 14 दिवस पूर्ण झालेले सर्व लोक आता लोकल ट्रेनमध्ये प्रवास करू शकणार आहेत. तसेच अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

CR व  WR मुंबई विभागावर अनुक्रमे 1702 आणि 1304 उपनगरीय सेवा चालवत आहेत जे त्यांच्या एकूण उपनगरीय सेवांपैकी 95.70% आहेत. 28 ऑक्टोबर 2021 पासून मध्य व पश्चिम रेल्वे मुंबई विभागावर उपनगरीय सेवा कोविडपूर्व पातळीपर्यंत म्हणजेच 100% सेवा चालवणार आहेत.  CR वर 1774 आणि WR वर 1367 एकूण सेवा सुरू करण्यात येणार आहेत.

सध्या, मध्य आणि पश्चिम रेल्वे दोन्ही मासिक पास जारी करत आहेत. जेणेकरून गाड्यांमधील लोकांची गर्दी नियंत्रणात राहील.  मात्र आता रोजच्या तिकीटातूनही प्रवास करता येणार आहे.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments