
Mahakali Caves : तुम्ही मुंबईमध्ये आजवर फक्त एलिफंटा किंवा कान्हेरी लेणीला भेट दिली असेल. पण या व्यतिरिक्त आणखी लेण्या मुंबईत स्थित आहेत. त्या लेण्यांपैकी एक म्हणजे मुंबईतील महाकाली लेणी. तुम्ही वीकेण्डचे निमित्त साधून कुटुंबासह येथे पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. मुंबईत बघण्यासारख्या अनेक सुंदर ठिकाणांपैकी या लेण्या अधिक सुंदर व या लेण्यांचा इतिहास हा जाणून घेण्यासारखा आहे.(So the Mahakali Caves in Mumbai are world famous, with a long history)
महाकाली लेणी ही कोंडीवटी या नावाने देखील ओळखली जाते. मुंबईतील आरे कॉलनी व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात या लेणी वसलेल्या आहेत. डोंगरावरील लेणी पूर्वेला 15 व पश्चिमेला 4 अशी दोन भागात पसरली आहे. पश्चिमेला लेण्यातील चार विहारापैकी एक भोजनकक्ष आहे. या गुंफांतील स्तुपांचा आकार शिवलिंगासारखा वाटल्याने, त्यांना महाकाळ असे देखील म्हटले जाते.
येथे बौद्धांच्या लेण्या, भिक्खू निवास आहेत. तर यात बुद्धाच्या एकूण 19 लेणी असून विविध स्तूपही पहायला मिळतील. महाकाली लेणीच्या टेकडीच्या पायथ्याशी असलेले सध्याचे हिंदू देवी महाकालीच्या मंदिरावरून या लेण्यांना महाकाली हे नाव पडले आहे. तसेच या लेण्या इसवी सन पूर्व 1 ते इसवी सन 6 या काळात बांधण्यात आल्या आहेत.
पश्चिम रेल्वेवर अंधेरी रेल्वे स्थानकापासून 6 कि.मी. अंतरावरील लहान टेकडीवर ही लेणी कोरलेली आहे. बुद्ध काळात हे अभयारण्य एक प्रमुख धार्मिक केंद्र म्हणून ओळखले जायचे. या गुहेत 19 विहारांचा समावेश आहे.
महाकाली ही लेणी मुंबईतील महाकाली लेणी रोड, सुंदर नगर, अंधेरी पूर्व, येथे स्थित आहे. ही लेणी पर्यटकांना पहाण्यासाठी सोमवार ते रविवार सर्व दिवस खुली असते. तर तुम्ही येथे सकाळी 9 ते सायंकाळी 6 च्या दरम्यान भेट देऊ शकता. महाकाली लेणीमध्ये प्रवेश करताना प्रति व्यक्ती फक्त 20 रुपये शुल्क आकारले जाते.
हे ही वाचा :