Uncategorized

Mumbai Police Video : ‘मेरे सपनो की रानी’, मुंबई पोलिसांच्या ‘या’ व्हिडीओने जिंकली लोकांची मने

मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा लोकांची मने जिंकली आहेत. बॉलिवूड क्लासिक 'मेरे सपने की रानी'ची आठवण करून देणारा मुंबई पोलीस बँडचा एक बहारदार व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा लोकांची मने जिंकली आहेत. बॉलिवूड क्लासिक ‘मेरे सपने की रानी’ची आठवण करून देणारा मुंबई पोलीस बँडचा एक बहारदार व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Mumbai Police Video)

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आपल्या त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामुळे सोशल मीडियावर मुंबई पोलिसांचे फॅन फॉलोइंग देखील खूप वाढले आहेत. मुंबई पोलिसांच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या मजेदार पोस्ट लोकांना आवडतात, आतादेखील अशीच एक पोस्ट शेअर करून लोकांची मने जिंकली आहेत. मुंबई पोलिसांच्या बँड विभागाने बॉलिवूड क्लासिक ‘मेरे सपने की रानी’ या गाण्यावर बहारदार संगित सादर केले आहे. (instrumental version of the Kishore Kumar classic)

खाकी स्टुडिओ नावाच्या बँडच्या व्हिडिओमध्ये राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्या डान्सची झलकही दाखवण्यात आली आहे. 1969 च्या आराधना चित्रपटातील हा ट्रॅक प्रसिद्ध संगितकार एस डी बर्मन यांनी तयार केला होता.

खाकी स्टुडिओ घेऊन येत आहे मुंबई पोलीस जवानांचे नवीन सादरीकरण, एस.डी. बर्मन आणि किशोर कुमार यांच्या सुरांच्या खजिन्यातील एक सदाबहार गाणे, “मेरे सपनों की रानी”…

पाहा व्हिडीओ….

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Police (@mumbaipolice)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments