स्पोर्ट

IPL 2021 च्या प्लेऑफमध्ये जाण्यासाठी MI ला मोडावा लागेल स्वत:चा रेकॉर्ड | IPL 2021 playoffs

प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मुंबई इंडियन्सकडे असलेल्या संधीही गमवल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

IPL 2021 playoffs : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेला सामना हा मुंबईसाठी धोक्याचा इशारा ठरला आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मुंबई इंडियन्सकडे असलेल्या संधीही गमवल्याचे चित्र निर्माण झाले आहे, मात्र अजूनसुद्धा मुंबईकडे प्लेऑफमध्ये जाण्याची एक संधी आहे, मात्र ती कोणती, हेच आपण आज पाहणार आहोत. (MI will have to break its own record to advance to the IPL 2021 playoffs)

आयपीएल 2021 मध्ये प्लेऑफमध्ये जाणारे संघ म्हणजेच चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आहेत, यामध्ये प्लेऑफमध्ये जाणारा CSK हा पहिला संघ ठरला आहे, त्यानंतर DC ने बाजी मारली आहे.

आता RCB ने पहिल्या तीनमध्ये प्रवेश केल्यानंतर, चौथ्या आणि अंतिम संघाबद्दल चर्चा सुरु आहे. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात चौरंगी लढत होऊन कोणतातरी एक संघ प्लेऑफमध्ये जाऊ शकतो.

आता, शारजाहमध्ये गुरुवारी रात्री RR वर 86 धावांनी विजय मिळवल्यानंतर KKR ने प्लेऑफमध्ये स्थान मिळवणे काही प्रमाणात निश्चित झाले आहे, मात्र, अबुधाबीमध्ये शुक्रवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्याचा निकाल लागेपर्यंत चौथ्या स्थानावर नेमका कुठला संघ जाईल, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

IPL 2021 मध्ये 8 ऑक्टोबरला पहिल्यांदाच 2 आयपीएल सामने एकाच वेळी होणार आहेत. एका बाजुला RCB विरुद्ध DC चा सामना रंगणार असताना दुसऱ्या बाजुला MI विरूद्ध SRH सामना चर्चेचा ठरणार आहे. गतविजेता MI संघ अजूनही प्लेऑफमध्ये पात्र ठरू शकतो, मात्र त्यांना आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांपैकी सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.

गुरुवारी RR विरुद्ध KKR यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामुळे MI ची वाटचाल कठीण झाली आहे. KKR विरूद्ध RR यांच्यातल्या सामन्यापूर्वी, MI ला फक्त विजय गरजेचा होता, मात्र KKR च्या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये KKR ने +0.587 ने झेप घेतलीये, याचा साधा अर्थ असा की MI ला आता फक्त सामना जिंकणे इतकच टार्गेट नसणार आहे, तर प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना गुणतालिकेमध्येही सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. म्हणजेच MI जर पहिला बँटिंग करणार असेल तर त्यांना कमीत कमी 171 धावा किंवा त्यापेक्षा जास्त फरकाने SRH चा पराभव करावा लागेल.

SRH ला या मोठ्या फरकाने हरवणे हे MI साठी मोठं चॅलेंज असेल, मात्र MI ही गोष्ट करू शकेल, असही अनेकांना वाटतं, कारण MI ने याआधी ही गोष्ट केली आहे, आयपीएलमध्ये विजयाचे सर्वात मोठे अंतर 146 धावांचे आहे, जे MI ने आयपीएल 2017 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मिळवले. त्यामुळे ही गोष्ट सध्या MI करू शकेल, असंही अनेक चाहत्यांकडून म्हटलं जात आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments