खूप काहीटेक

Mini Fire Station : मुंबईमध्ये उभारणार 10 मिनी फायर स्टेशन; पहा कसा असेल त्यांचा फायदा

मुंबईमध्ये लवकरच 10 मिनी फायर स्टेशन सुरू होणार आहेत.

Mini Fire Station :  मुंबईमध्ये व इतर ठिकाणी मोठ्याप्रमाणात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्याचा नागरिकांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे आगीच्या वाढत्या घटना पाहता त्यावर तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी BMC ने मिनी फायर स्टेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.(10 mini fire stations to be set up in Mumbai;  See how they benefit)

मुंबईमध्ये लवकरच 10 मिनी फायर स्टेशन सुरू होणार आहेत. आता मुंबईत मिनी फायर स्टेशन्सची संख्या एकूण 28 होणार आहे. तसेच आग विझवण्यासाठी मुंबईत 35 अग्निशमन केंद्रे देखील आहेत.

 मुंबईतील आगीच्या वाढत्या घटना व वाहतुकीची वाढती समस्या लक्षात घेता मुंबई महापालिकेने मुंबईतील विविध भागात मिनी फायर स्टेशन्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे.  अग्निशमन विभागाकडून आतापर्यंत 18 मिनी अग्निशमन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.  आणखी 10 मिनी फायर स्टेशन लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

BMC च्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले की, वाढत्या रहदारीमुळे अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी सरासरी 20 ते 30 मिनिटे लागतात, तर आगीची दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी कमीत-कमी 5 ते 8 मिनिटे लागायला हवीत.  आगीच्या घटनांमध्ये, घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्यानंतर आग पसरण्याचे प्रमाण वाढते.  यासाठी मिनी फायर स्टेशन बांधण्याचा निर्णय BMC कडून घेण्यात आला आहे.  मिनी फायर स्टेशनवरून अग्निशमन दल लवकर आल्यानंतर आग आटोक्यात आणू शकणार आहे.

मिनी फायर स्टेशन या ठिकाणी होणार सुरू

गोदरेज कॅम्पस विक्रोळी, गोराई गाव बोरिवली पश्चिम, बोरिवली पूर्व दहिसर गाव, जुहू तारा रोड सांताक्रूझ, कुर्ला पश्चिम टाकिया रोड, हंसराज भुग्रा मार्ग, सांताक्रूझ पूर्व, SFTC वडाळा ट्रक टर्मिनल, लोढा फ्लोरेन्स गोरेगाव पूर्व,  शिवसृष्टी VN पूर्व कुर्ला पूर्व, टिळक नगर चेंबूर एम पूर्व प्रभाग.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments