खूप काही

Ministry of Defense Recruitment 2021: मुंबईच्या संरक्षक मंत्रालयाअंतर्गत भरती, पहा शैक्षणिक अट काय?

या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

Ministry of Defense Recruitment 2021 : मुंबईत नोकरी शोधत आहात का?तर मुंबईमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. मुंबई येथे संरक्षण मंत्रालयात वैज्ञानिक सहाय्यक या पदांसाठी भरती होणार आहे. या पदासाठी एकूण 13 जागा रिक्त आहेत.पात्र उमेदवारांनी या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणून जे उमेदवार येथे नोकरी करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांनी लवकरात लवकर ऑफलाईन पध्दतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.(Recruitment under the Ministry of Defense, Mumbai, see What is the educational condition?)

शैक्षणिक पात्रता, अनुभव व वयोमर्यादा

या पदांसाठी उमेदवारांकडे फिजिक्स, केमेस्ट्री किंवा इतर विषयांमध्ये B.Sc. ची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच या पदा संबंधित जाहिरातीत देण्यात आलेल्या काही क्षेत्रांमध्ये कमीतकमी दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.या पदांसाठी पात्र उमेदवाराचे वय 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.त्या पेक्षा जास्त वयाच्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाहीत.

निवड प्रक्रिया व पगार

या पदभरतीसाठी निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत अशा पध्दतीने पार पडणार आहे. त्यासाठी दहा मार्काची इंग्रजी, Aptitude दहा मार्कचे, दहा मार्काची Reasoning, वीस मार्कांची विज्ञान तर 50 मार्काचे फिल्ड किंवा ट्रेड्शी संबंधित प्रश्न असणार आहेत.या पदांसाठी पात्र उमेदवाराला 35,400 ते 1,12,400 इतका पगार असू शकतो.

वैज्ञानिक सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवाराने
फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ, हेडक्वेटीवर, वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलार्ड इस्टेट, टायगर गेट जवळ, मुंबई 400001 या पत्यावर ऑनलाइन पध्दतीने अर्ज पाठवू शकता.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments