
Mount Mary Church : मुंबई हे स्वप्नांचे शहर मानले जाते.येथे तुम्हाला अद्भुत आणि आकर्षक वास्तू पाहायला मिळतील ज्या मुंबईत अनेक वर्षांपासून स्थापित आहेत.त्या वास्तूंपैकी एक असलेले मुंबईतील प्रसिद्ध ‘बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ द माउंट’ हे आयकॉनिक चर्च,ज्याला माउंट मेरी चर्च असेही म्हटले जाते. हे चर्च समुद्रसपाटीपासून 80 मीटर उंचीवर स्थित आहे. जिथून आपल्याला अद्भुत अरबी समुद्राचे दर्शन घेता येते.माउंट मेरी चर्च येथे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात जत्रा भरवली जाते.या साजऱ्या होणाऱ्या जत्रेचा आनंद तुम्ही घेऊ शकता.(See the 300 year old church in Mumbai, dedicated to the Virgin Mary)
माऊंट मेरी फेअर
माउंट मेरी फेअर अर्थात सेलिब्रेशन मदर मेरी जयंती ही जयंती दरवर्षी 10 ते 17 सप्टेंबर दरम्यान वांद्रे येथील माउंट मेरी चर्चमध्ये आयोजन केले जाते. या चर्चमध्ये मदर मेरीचा वाढदिवस 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. याची आठवण म्हणून वांद्रे येथील माउंट मेरी चर्चच्या आवारात माऊंट मेरी मेळावा(जत्रा) आयोजित केला जातो. या 8 दिवसांच्या जत्रेत माउंट मेरी चर्च येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.विशेष म्हणजे या मेळाव्यात सर्व धर्माचे लोक सहभागी होत असतात.
माऊंट मेरीच्या जत्रेला लाखो लोक भेट देतात, त्यामुळे जत्रेदरम्यान, अनेक व्यापारी चर्चमध्ये त्यांचे स्वतःचे स्टॉल लावत असतात.हे स्टोल लावण्यासाठी एक महिना अगोदर व्यापारी अर्ज करत असतात.स्टॉलची जागा तीन भागांमध्ये विभागली गेली असते.
माउंट मेरी चर्चची वैशिष्ट्ये
माउंट मेरी चर्च (माउंट ऑफ अवर लेडी) 1640 मध्ये बांधण्यात आले आहे,तर 1761 मध्ये हे चर्च पुन्हा बांधले गेले. माउंट मेरी चर्च हे जगभरातील सुंदर चर्चपैकी एक मानली जाते. माउंट मेरी चर्च गेली 300 वर्षे जुने आहे.तसेच हे चर्च मुंबईची ओळख म्हणून उभे आहे.माउंट मेरी चर्च हे मुंबई शहरातील विशिष्ट आणि भव्य चर्चांपैकी एक असून माउंट मेरी चर्च व्हर्जिन मेरीला समर्पित आहे.ही अतिशय सुंदर वास्तूरचना आहे.येथे अनेक भाविक व पर्यटक खूप मोठ्या संख्येने भेट देतात.
माउंट मेरी हे मुंबईतील वांद्रे पश्चिम येथे स्थित आहे.येथे प्रवेश करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. हे सर्व दिवस खुले असते.हे चर्च सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत खुले असते. नंतर ते एक तासासाठी बंद केले जाते व पुन्हा दुपारी 2 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत खुले असते.
माउंट मेरी चर्च #मुंबई उपनगर .बांद्रा पश्चिम परिसर में स्थित यह एक प्रसिद्ध चर्च है. इस भव्य चर्च का निर्माण १६४० में हुआ तथा १७६१ में इसका पुनरनिर्माण किया गया. वर्जिन मेरी को समर्पित इस चर्च में प्रती वर्ष सितंबर माह में मेले का आयोजन होता है.#VisitMaharashtra pic.twitter.com/KQxn9IQAuZ
— महाराष्ट्र सूचना केंद्र (@MahaMicHindi) November 17, 2019
हे ही वाचा :