खूप काही

MSEDCL Recruitment 2021 : महावितरण पनवेल येथे अप्रेन्टिस पदासाठी भरती,पहा कसे कराल अप्लाय…

पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज भरावे, कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 ही आहे.

MSEDCL Recruitment 2021 : तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का?तर तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी पनवेल येथे भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी पनवेल येथे अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) या पदांसाठी भरती होणार असून येथे एकूण 74 जागा रिक्त आहेत. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज भरावे, कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 ही आहे.(Recruitment for Apprentice post at MSEDCL Panvel, see how to apply …)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी पात्र उमेदवाराचे शिक्षण दहावी उत्तीर्ण, तसेच दहावीनंतर इलेक्ट्रिकलमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.तसेच संबंधित विषयाचे अनुभव असणे गरजेचे आहे.

काही महत्त्वाच्या सूचना

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी पनवेल या पदभरतीसाठी दहावी आणि ITI च्या मार्कांवर उमेदवाराची निवड केली जाणार आहे. म्हणजेच ज्या उमेदवारांना जास्त मार्क्स अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.उमेदवारांची निवड करताना आरक्षणाचा विचार करून ही निवड केली जाणार आहे.तसेच उमेदवारांनी ऑनलाईन अप्लाय करताना काळजीपूर्वक संपूर्ण माहिती भरणे गरजेचे आहे. माहिती अपूर्ण असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.

आवश्यक कागदपत्रे

दहावी व ITI शिक्षणाच्या चारही सेमिस्टर्सच्या प्रमाणपत्रांची मूळप्रत,आधारकार्ड,
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र,Domicile,उच्च आणि उन्नत गटांमध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र सदर सर्व कागदपत्रे उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

वरील सर्व प्रमाणपत्र उमेदवारांनी ऑनलाईन अप्लाय करताना स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 ही आहे.अधिक माहितीसाठी उमेदवाराने  www.mahatransco.in या लिंकवर क्लिक करा.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments