फेमस

Mumbai Famous : सेंट थॉमस कॅथेड्रल चर्च मुंबईतील प्रतिष्ठित ठिकाण; पहा का आहे खास…

सेंट थॉमस कॅथेड्रल चर्च हे एकांत व शांततेचे प्रतीक आहे,

Mumbai Famous :मुंबई शहर हे त्याच्या भव्य इमारतींसाठी देखील खूप प्रसिद्ध आहे. मुंबईत अनेक जुने बांधकाम केलेल्या ब्रिटिश काळातील सुंदर व प्रतिष्ठित अशा इमारती पाहायला मिळतील. व अशा भव्य, सुंदर कोरीवकाम केलेल्या इमारती व त्यांचे इतिहास जाणून घेण्यासाठी बहुसंख्य पर्यटक अशा स्थळांना भेट देत असतात. अशीच एक इमारत असलेले मुंबईतील सेंट थॉमस कॅथेड्रल चर्च हे 1718 सालातील मुंबई शहरातील सर्वात जुने आणि सर्वात प्रतिष्ठित ठिकाणांपैकी एक आहे. (St. Thomas Cathedral Church in Mumbai;  See why it’s special …)

सेंट थॉमस कॅथेड्रल चर्च हे एकांत व शांततेचे प्रतीक आहे, जे सुखदायक पांढर्‍या व पिवळ्या रंगात रंगवलेले असून ते  सुंदर अलंकारांनी सजलेले आहे. सेंट थॉमस कॅथेड्रलने पूर्वीच्या बॉम्बेतील पहिले अँग्लिकन चर्च म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे. ख्रिस्ताच्या 12 शिष्यांपैकी एक, सेंट थॉमस यांचे नाव असलेले, हे चर्च मुंबईत येणाऱ्या प्रत्येक पर्यटकासाठी आवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण आहे.

सेंट थॉमस कॅथेड्रल चर्चचा इतिहास

सेंट थॉमस कॅथेड्रल चर्चची पायाभरणी 1676 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे तत्कालीन गव्हर्नर जेराल्ड ऑन्गियर यांनी केली व बांधकामाचे काम देखील लगेचच सुरू झाले. परंतु ऑन्गियरच्या मृत्यूनंतर, चर्चचे बांधकाम देखील थांबले. जवळजवळ अर्ध्या शतकानंतर त्याचे पुनरुज्जीवन झाले.

रिचर्ड कोबे नावाचा तरुण उत्साही चॅपलनी हा 1715 मध्ये मुंबईत आला व त्याने अर्धवट बांधलेले चर्चचे काम हाती घेतले. 1715 ते 1718 या तीन वर्षांत त्यांनी चर्चचे बांधकाम पूर्ण केले होते.  1718 साली सेंट थॉमस कॅथेड्रल चर्च च्या ख्रिसमस सणाच्या दिवशी सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले.

300 वर्ष जुना असलेला सेंट थॉमस कॅथेड्रल चर्च जुलै 1837 मध्ये कॅथेड्रल म्हणून पवित्र करण्यात आले होते. तसेच चर्चचा पहिला बिशप म्हणून थॉमस कार यांची नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर 1838 मध्ये, चर्चच्या पश्चिमेकडे एक घड्याळ व एक टॉवर जोडण्यात आले.

मुंबई लोकलच्या प्रसिद्ध चर्चगेट स्थानकाचे व परिसरातील चर्चगेटचे नाव सेंट थॉमस कॅथेड्रल चर्चच्या एका गेटवरून ठेवण्यात आले आहे. मुंबईतील हे प्रसिद्ध चर्च काळा घोडा, किल्ला, मुंबई येथे स्थित आहे. सेंट थॉमस कॅथेड्रल हे  सकाळी 7 ते सायंकाळी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खुले असते. येथे तुम्ही कोणत्याही दिवशी भेट देऊ शकता. कारण हे सर्व दिवस खुले असते.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments