Uncategorizedनॅशनल

Mumbai least happy : घर खरेदीमध्ये मुंबई जगातील दु:खी शहर; तर हे शहर सर्वात आनंदी, काय आहे भानगड, नक्की पाहा…

एका कंपनीने केलेल्या सर्व्हेनुसार मुंबई हे घर खरेदी करण्यामध्ये सर्वात कमी आनंदी शहर माणले जाते

Mumbai least happy : आजकाल अनेक लोक घर खरेदी करत आहेत, फक्त भारताचा विचार केला तर मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरामध्ये घर खरेदी करण्याची टक्केवारी अधिक वाढली आहे, त्यामुळे घर खरेदी करण्यामध्ये मुंबईला जास्त पसंती आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे, मात्र हा दावा आता फोल ठरला आहे, कारण एका कंपनीने केलेल्या सर्व्हेनुसार मुंबई हे घर खरेदी करण्यामध्ये सर्वात कमी आनंदी शहर माणले जाते, आता ते कसं, हे पुढे नक्की वाचा. (Mumbai least happy city in the world)

मालमत्ता खरेदी करण्यासाठी मुंबई हे भारतातील सर्वात महागडे शहर माणले जाते, अनेकांची इथे पसंती आहे, इथे घर खरेदी करण्यासाठी अनेकांच्या रांगा लागतात, तरीहीही एका कंपनीने म्हटलं आहे की इथे घर खरेदी करणारे लोक सर्वात कमी आनंदी असतात. गुजरातच्या सूरतमध्ये घर खरेदी करणारे लोक कमी आनंदी असण्याच्या पाचव्या क्रमांकावर आहेत.

काय आहे प्रकरण?

जागतीक पातळीवर घर खरेदी आणि विक्री करणाऱ्या यूके फर्म आणि ऑनलाइन मॉर्टगेज अॅडव्हायझर या साईटने एक सर्व्हे केला. या सर्व्हेमध्ये जगातील टॉप 20 शहरांची नोंद केली. या 20 शहरांमध्ये घर खरेदी केलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद किती आहे, याचे अॅनॅलिसीस करण्यात आले. त्याचे 3 भागांमध्ये वर्गीकरण झाले. एक म्हणजे सर्वात आनंदी, दोन म्हणजे कमी आनंदी आणि तीन म्हणजे दु:खी लोक.

कसा केला सर्व्हे?

हा सर्व्हे ऑगस्ट 2021 मध्ये इन्स्टाग्राम या सोशल साईटवर करण्यात आला. तेथील पोस्टचे दोन भाग करण्यात आले. सध्याच घर खरेदी केल्यानंतर सोशल मीडियावर फोटो अपलोड करताना वापरल्या जाणाऱ्या # Tag चा इथे प्रामुख्याने विचार करण्यात आला. उदाहरण द्यायचं झाल्यास #selfie आणि #homeowner. अशा #TAG चा वापर करून अपलोड केलेले फोटो एकत्र करण्यात आले, आणि त्या नागरिकांच्या फोटोवरून त्यांना किती आनंद झाला आहे, याचा सर्व्हे केला.

मायक्रोसॉफ्ट अझ्यूर या सॉफ्टवेअरचा इथे वापर करण्यात आला, हे सॉफ्टवेअर चेहर्यावरील भावना ओळखत असतं, उदाहरणार्थ राग, तिरस्कार, भीती, आनंद, दुःख, आश्चर्य किंवा तटस्थ. अशा गोष्टींमुळे अॅनॅलिसीस करून शहरांचे वर्गीकरण करण्यात आलं.

कोणत्या शहरांचा समावेश?

अमेरिकेतील अटलांटा आणि ऑस्ट्रेलियातील सिडनी हे जागतिक घर खरेदी करण्यासाठी दुसरे आणि तिसरे सर्वात दुःखी ठिकाण माणले गेले. पॅरिस 7 व्या क्रमांकावर आणि दुबई 19 व्या क्रमांकावर आहे.

घर खरेदी करण्याच्या जगातील पहिल्या 20 सर्वात आनंदी शहरांमध्ये चंदीगड 5 व्या क्रमांकावर, जयपूर 10 व्या स्थानावर, चेन्नई 13 व्या स्थानावर, तर इंदूर आणि लखनौ अनुक्रमे 17 व्या आणि 20 व्या स्थानावर आहेत.

स्पेनमधील बार्सिलोना आणि इटलीमधील फ्लोरेन्स ही जगातील घर खरेदी करणारी सर्वात आनंदी ठिकाणे असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. बार्सिलोनाच्या घर खरेदीदारांच्या फोटोंना 100 पैकी सरासरी 95.4 गुण मिळाले आहेत. या सर्व्हेक्षणात चंदीगडने 13 टक्के, जयपूरने 10.8 टक्के, चेन्नईने 8.9 टक्के, इंदूरने 7.4 टक्के आणि लखनौने 7.1 टक्के गुण मिळवले आहेत.

संबंधीत बातम्या :

Mhada home : म्हाडाची बम्पर ऑफर, 9000 घरांची निघणार लॉटरी; पहा लोकेशन

Vasai Fort : भेट द्या वसई किल्ल्याला,पहा तिथे नेमकं पाहण्यासारखं काय आहे?

Mumbai Recruitment : बृहन्मुंबई महानगरपालिका येथे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती;पहा किती जागा रिक्त…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments