आपलं शहरलोकल

Mumbai Local : म्हणून 28 ऑक्टोबरपासून मध्य व पश्चिम रेल्वे 100 टक्के क्षमतेने धावणार…

28 ऑक्टोबर 2021 पासून मध्य व पश्चिम रेल्वे मुंबई विभागावर उपनगरीय सेवा कोविडपूर्व पातळीपर्यंत म्हणजेच 100% सेवा चालवणार आहेत.

Mumbai Local : मुंबईकर व इतर रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी. मुंबईतील मध्य व पश्चिम रेल्वेने गुरुवार, 28 ऑक्टोबरपासून मुंबई विभागावर 100 टक्के उपनगरीय रेल्वे सेवा प्री-कोविड स्तरावर पुनर्संचयित करण्याची घोषणा केली आहे.(Therefore, from October 28, Central and Western Railways will run at 100 percent capacity …)

कोरोनाचा धोका थोड्याफार प्रमाणात कमी झाल्याने सरकारने महाविद्यालये व शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे  महाविद्यालये व शाळा सुरू करण्यात आल्या,अशात मध्य व पश्चिम रेल्वेच्या गाड्यांमध्ये प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे.  सध्या, CR व  WR मुंबई विभागावर अनुक्रमे 1702 आणि 1304 उपनगरीय सेवा चालवत आहेत जे त्यांच्या एकूण उपनगरीय सेवांपैकी 95.70% आहेत.

28 ऑक्टोबर 2021 पासून मध्य व पश्चिम रेल्वे मुंबई विभागावर उपनगरीय सेवा कोविडपूर्व पातळीपर्यंत म्हणजेच 100% सेवा चालवणार आहेत.  CR वर 1774 आणि WR वर 1367 एकूण सेवा सुरू करण्यात येणार आहेत.  त्यानंतर ऑगस्ट 2021 मध्ये व अलीकडच्या आठवड्यात राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिलेल्या प्रवाशांच्या श्रेणींमध्ये उपनगरीय गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी विस्तार करण्यात आला होता.  सध्या, राज्य सरकारने ओळखलेल्या श्रेणींना SOP नुसार प्रवास करण्याची परवानगी आहे.

कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे 22 मार्च 2020 पासून मध्य व पश्चिम रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती.  नंतर 15 जून 2020 पासून, रेल्वेने, राज्य सरकारने ओळखलेल्या आणि रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या अत्यावश्यक सेवा श्रेणींसाठी उपनगरीय सेवा सुरू करण्यात आल्या होत्या.परंतु आता या रेल्वे सेवा 100 टक्के चालवण्यात येणार आहेत.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments