आपलं शहरटेक

Mumbai local update : लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, पहा काय होणार परिणाम

रविवारी 3 ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वे आणि मुंबई विभागात मेगाब्लॉक चालवला जाणार आहे. रेल्वेच्या विविध अभियांत्रिकी व देखभालीच्या कामांसाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे.

Mumbai local update :  मध्य रेल्वेने एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे.त्या पत्रकात रविवार 3 ऑक्टोबर 2021रोजी मध्य रेल्वे,मुंबई विभागाने मेगाब्लॉकची घोषणा केली आहे.त्यामुळे रविवारी मुंबईकरांना प्रवासासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागणार आहे.हा मेगाब्लॉक मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे रूलांवर सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत असणार आहे.(Megablocks on all three routes of the local, see what the consequences will be)

हा मेगाब्लॉक केवळ मध्य रेल्वे व मुंबई विभागावर लागू असणार आहे.मेगाब्लॉक कालावधी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई व वाशी विभागात विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.तर ठाणे,वाशी व नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा ही उपलब्ध असणार आहेत. तसेच ब्लॉक कालावधी दरम्यान बेलापूर व खारकोपर दरम्यान उपनगरीय ट्रेन सेवा वेळापत्रकानुसारच चालवल्या जाणार आहेत. या लाईनवरील सेवा सुरळीत चालू असणार आहेत.

रविवारी 3 ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वे आणि मुंबई विभागात मेगाब्लॉक चालवला जाणार आहे. रेल्वेच्या विविध अभियांत्रिकी व देखभालीच्या कामांसाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. ठाणे,दिवा अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते सायंकाळी 4 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.त्यामुळे या रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही प्रमाणात अडचणी येण्याची शक्यता आहे.

मुंबईतील मुलुंड येथून सकाळी 10.43 ते दुपारी 3.46 पर्यंत सुटणारी डाउन मार्गावरील अर्धजलद सेवा मुलुंड आणि दिवा स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविण्यात येणार असून ही रेल्वे सेवा ठाणे, दिवा स्थानकांवर थांबणार आहेत.ही रेल्वे सेवा वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान सुटणाऱ्या व येणाऱ्या सर्व अप आणि डाउन धीम्या सेवाही वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशीराने येतील व येथून सुटणाऱ्या गाड्या ही 10 मिनिटे उशिराने सुटणार आहेत.तर पनवेल,वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4 .05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे नेरुळ व खारकोपर सेवा बंद राहणार आहे.

पनवेल येथून सकाळी 10.49 ते सायंकाळी 4.01 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या दिशेने सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा मेगा ब्लॉकमुळे बंद ठेवल्या जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी 10.03 ते 3.16 या वेळेत पनवेल व बेलापूरसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्या आहेत.

सकाळी पनवेल येथून 9.01 ते दुपारी 3.53 पर्यंत ठाणेकरीता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहे.तसेच ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 या वेळेत पनवेलच्या दिशेने जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा मेगाब्लॉकमुळे रद्द केल्या आहेत.व सकाळी नेरूळ येथून 10.15 ते दुपारी 2.45 या वेळेत खारकोपरला जाणारी डाउन मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.45 ते दुपारी 3.15 या वेळेत नेरूळसाठी खारकोपरला सुटणारी अप मार्गावरील सेवा मेगाब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्या आहेत.

पायाभूत सुविधा आणि सुरक्षिततेच्या अनुषंगाने हा मेगाब्लॉक आवश्यक आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे.या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments