फेमस

Mumbai location : मलबार हिल मुंबईतील पॉश ठिकाण ,काय आहेत वैशिष्ट्य…

दक्षिण मुंबईतील मलबार हिल हे डोंगर 50 मीटर उंचीवर आहे.

Mumbai location :तुम्ही आजवर मुंबईतील अनेक प्रसिद्ध स्थळ पाहिले असतील किंवा त्या स्थळांबद्दल ऐकले असेल,त्यापैकीच एक लोकप्रिय व महागडं समजलं जाणार ठिकाण म्हणजे मुंबईतील मलबार हिल. मलबार हिल हे दक्षिण मुंबईतील एक टेकडी व शहरातील प्रमुख निवासी भागांपैकी एक आहे.  दक्षिण मुंबईतील मलबार हिल हे डोंगर 50 मीटर उंचीवर आहे. मलबार हिल्स जगातील सर्वात महागड्या निवासी क्षेत्रांपैकी एक आहे.येथे अनेक सेलिब्रिटी, महाराष्ट्राचे राज्यपाल व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे अधिकृत निवासस्थान देखील आहे. तुम्ही या टेकडीला एकदा नक्की भेट द्या.(Malabar Hill is a posh place in Mumbai, what are the features …)

असे मानले जाते की, मलबार हिल हा परिसर सुरुवातीला केई कुटुंबाच्या (व्यापारी मुस्लीम कुटुंब) मालकीचा होता.जे केरळच्या उत्तर मलबार प्रदेशातील होते. त्या कुटुंबाचे पोर्तुगीज, ब्रिटीश व फ्रेंच बरोबर व्यापारी संबंध होते, परंतु जेव्हा ब्रिटिशांनी त्यांच्या व्यावसायिक फायद्यांसाठी समस्या निर्माण करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांनी ब्रिटिशांशी युद्धबंदी केली व संपूर्ण क्षेत्र इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीला दान केले. त्यामुळे हे क्षेत्र इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीची मालमत्ता बनले.

मुंबईचे गव्हर्नर माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी मलबार हिल येथे 1819 ते 1827 काळात पहिला बंगला बांधला होता. परंतु आता, मलबार हिल्स मुंबईतील पॉश परिसरांपैकी एक बनले आहे. मलबार हिल्स मधील घरे जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक मानले जाते कारण येथे अनेक प्रसिद्ध ठिकाण जसे की बॅक बे, गिरगाव चौपाटी व नरिमन पॉईंट पहायला मिळते.

पर्यटन स्थळ
मलबार हिल हे सिल्हारा राजांनी बांधलेल्या वाळकेश्वर मंदिरासह मुंबईच्या प्रमुख पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. मलबार हिल परिसराच्या आजूबाजूला अनेक प्रसिद्ध ठिकाण आहेत,ते म्हणजे तारापोरवाला मत्स्यालय , मरीन ड्राइव्ह , गेट वे ऑफ इंडिया , कुलाबा कॉजवे , छत्रपती शिवाजी वास्तू संग्रहालय , छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि हेरिटेज संग्रहालय, जहांगीर आर्ट गॅलरी , नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, आरबीआय मौद्रिक संग्रहालय, बॉम्बे हायकोर्ट , बलार्ड बंदर गेटहाऊस व इन्स्टिट्यूट ऑफ समकालीन भारतीय कला अशी मुंबईतील बहुसंख्य लोकप्रिय ठिकाण येथे पाहायला मिळतील.

मलबार हिल हे पर्यटकांना आकर्षित करते,व हे ठिकाण पर्यटकांसाठी 24 तास खुले असते.येथे कोणताही प्रवेश शुल्क आकारले जात नाही.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments