खूप काही

Mumbai Metro Update : BMC निवडनिकांपूर्वी मुंबईतील मेट्रो 2 ए चा पहिला टप्पा सुरू,पहा कुठपर्यंत आलं काम

मुंबईतील मेट्रो 2 ए चा पहिला टप्पा हा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

Mumbai Metro Update :मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी. मुंबईतील मेट्रो 2 ए चा पहिला टप्पा हा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. दहिसर व डीएन नगर या पश्चिम उपनगरांदरम्यान मुंबई मेट्रो लाइन 2 ए च्या अंतिम आय-गर्डरचे लोकार्पण झाल्यानंतर, ट्रॅक टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. दहिसर व डीएन नगर या पश्चिम उपनगरांदरम्यान मुंबई मेट्रो लाइन 2 ए च्या अंतिम आय-गर्डरचे लोकार्पण झाल्यानंतर, ट्रॅक टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.(The first phase of Metro 2A in Mumbai has started before the BMC elections, see how far the work has come)

MMRDA च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो 2 ए चा पहिला टप्पा यावर्षी म्हणजेच डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचे लक्ष्य आहे.  फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या BMC च्या निवडणुकांपूर्वी राज्य सरकारला या मेट्रोचा पहिला टप्पा सुरू करायचा आहे.  मेट्रो 2 ए प्रकल्प दोन टप्प्यात विभागला गेला आहे.  डहाणूरकरवाडी-दहिसर ते आरे मेट्रो स्टेशन दरम्यानची सेवा ही जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो 2 ए च्या 18.5 किमीच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे.  विभागातील व्हायाडक्टचे कामही पूर्ण झाले असून, नुकताच अंधेरीच्या आदर्श नगर जंक्शनवर शेवटचा गर्डर लॉन्च करण्यात आला.  यासह या मेट्रो मार्गाचा ट्रॅक पृष्ठभाग पूर्ण झाला आहे.  डीएन नगर-लिंक रोड-दहिसर मार्गावर ट्रॅक टाकण्याचे काम केले जाणार आहे.  महानगर आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, येथे राहणाऱ्या एकूण 40 हून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी लागला होता.

मेट्रो लाइन 2 ए आणि  7 या 12 हजार कोटींच्या प्रकल्पाच्याच्या पहिल्या टप्प्याची चाचणी सुरू करण्यात आली  आहे.  मुंबई मेट्रो लाईन्स 2 ए आणि 7 ला महाराष्ट्र सरकारने 6 ऑक्टोबर 2015 रोजी मान्यता दिली व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 ऑक्टोबर 2015 रोजी ‘भूमिपूजन’ करण्यात आले होते.  या संपूर्ण प्रकल्पाची किंमत सुमारे 12,000 कोटी रुपये आहे.  MMRDA डिसेंबर 2020 मध्ये या विभागावर व्यावसायिक कामकाज सुरू करणार होते, परंतु कोरोना महामारी, लॉकडाऊन आणि इतर कारणांमुळे या कामावर परिणाम झाला. परंतु आता  मेट्रो स्थानकांची सिव्हिल कामे सुरू करण्यात आली आहेत.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments