आपलं शहरफेमस

Mumbai Raj Bhavan : मुंबईतील राजभवन का करते पर्यटकांना आकर्षित, जाणुन घ्या इतिहास…

राजभवनाच्या तीनही बाजूंना समुद्र आहे. मलबार हिल येथील राजभवन निवासस्थान हे मैलभर लांब असलेली दाट वने, वाळुचे समुद्र किनारे व हिरवाईने व्यापलेले आहे.

Mumbai Raj Bhavan :मुंबईत तुम्ही आजवर अनेक सुंदर वास्तू पाहिल्या असतील, परंतु तुम्ही कधी महाराष्ट्रातील मुंबई येथे स्थित असलेल्या राजभवनाला कधी भेट दिली आहे का?मुंबई राजभवन हे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. मुंबई शहरातील ही एक अतिशय सुंदर वास्तू आहे. हे राजभवन अंदाजे 50 एकर जमिनीवर पसरलेले आहे.(Why Raj Bhavan in Mumbai attracts tourists, find out the history …)

राजभवनाच्या तीनही बाजूंना समुद्र आहे. मलबार हिल येथील राजभवन निवासस्थान हे मैलभर लांब असलेली दाट वने, वाळुचे समुद्र किनारे व हिरवाईने व्यापलेले आहे. मुंबई राजभवनाबाबत सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ते दिड शतकांपासून इतिहासाचे साक्षीदार आहे.या अद्भुत व सौंदर्याने नटलेल्या मुंबईच्या राज भवनाला तुम्ही एकदा नक्की भेट द्या.

मुंबई राजभवन येथे सुंदर गालिचे, चित्रे, अत्यंत सुंदर कोरीव काम केलेले दरवाजे, फ्रेंच शैलीच्या खुर्च्या व सुंदर प्रतिमा असलेले सोफे यांचा मौल्यवान संग्रह आहे. राजभवनाला भेट देणाऱ्या अभ्यागतांना या इमारतींचा इतिहास व येथे ठेवलेल्या काही वस्तूंबाबत नेहमीच उत्सुकता असते. हे संग्रह कला व इतिहासावर प्रेम करणाऱ्यांसाठी मौल्यवान आहे.

राज्यपालांचे निवासस्थान पूर्वी मुंबईच्या वाड्यात होते,नंतर ते अपोलो स्ट्रीट आणि नंतर परळ येथे स्थलांतरित झाले.1885 मध्ये, मलबार हिल येथे राजभवन निवासस्थानाची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून, हे ब्रिटिश गव्हर्नर आणि नंतर, महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे घर म्हणून ओळखले जाते.

मुंबईच्या राजभवणाला जर तुम्हाला भेट द्याची असेल,तर एक दिवस आधीच बुकिंग करा. कारण एका दिवसात फक्त 10-20 अभ्यागतांना परवानगी आहे. येथे पर्यटकांना सकाळी 6.15 ते सकाळी 8 वाजेपर्यंत जाण्याची परवानगी आहे. येथे राज्यपालांचे कर्मचारी, सहसा जनसंपर्क अधिकारी, दौऱ्यादरम्यान मार्गदर्शक म्हणून काम करतात.

मुंबईतील राजभवन हे ठिकाण सोमवार व सरकारी सुट्ट्या वगळता सर्व दिवस खुले असते. येथे प्रवेश करण्यासाठी फक्त 25 रुपये नोंदणी शुल्क आकारले जाते. मुंबईतील राजभवन वाळकेश्वर रोड, मलबार हिल , मुंबई , महाराष्ट्र  येथे स्थित आहे.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments