Mumbai Recruitment : बृहन्मुंबई महानगरपालिका येथे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती;पहा किती जागा रिक्त…
मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिका येथे सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी भरती होणार आहे.

Mumbai Recruitment :मुंबईत तुम्ही नोकरीच्या शोधात असाल,तर तुमच्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिका येथे सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी भरती होणार आहे. या पदांच्या एकूण 4 जागा रिक्त आहेत. इच्छुक उमेदवाराने त्वरित आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरावे , कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 ही देण्यात आली आहे.(Recruitment for the post of Assistant Professor at Brihanmumbai Municipal Corporation; see how many vacancies …)
शैक्षणिक पात्रता व अनुभव
पात्र उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका (एम.डी. पदवी , डी.एन.बी. किंवा एम.एस.) असणे आवश्यक आहे.
मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील (निवासी,रजिस्ट्रार,डेमॉन्स्ट्रेटर,टयूटर) म्हणून तीन वर्षांचा शिक्षक पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
परंतु या पदामध्ये निवृत्तीवेतन योजना व भविष्यातील योजना लागू होणार नाही. तसेच निवड झालेल्या उमेदवारास नियुक्तीनंतर मुंबई महानगरपालिका (सेवा) नियम 1989 व मुंबई महानगरपालिका सेवा (वर्तणूक) नियम 1999 लागू होणार नाही.
सदर पदामध्ये भरती होणाऱ्या उमेदवाराचे सर्वसाधारण वय 18 ते 38 दरम्यान असावे. मागासवर्गीयांकरीता 43 वर्षांपेक्षा अधिक नसावे. परीक्षा फी 300 रुपये घेतली जाणार आहे. सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी उमेदवाराचे वेतन 1 लाखापर्यंत असू शकते. नोकरीचे ठिकाण हे मुंबई आहे.
उमेदवाराने आपला अर्ज लो.ट.म.स रुग्णालय आणि महाविद्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड, सायन, मुंबई – 400022 या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. अधिक माहितीसाठी www.portal.mcgm.gov.in या लिंक वर क्लिक करा.
हे ही वाचा :