
Mumbai temples open : गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील सर्वच धार्मिक स्थळे कोरोनाच्या संकटामुळे भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. परंतु कोरोना व्हायरसचा धोका आता काही प्रमाणात कमी होत आहेत.म्हणून सरकारने जारी केलेल्या नियमावळींमध्ये आता थोड्या प्रमाणात शिथिलता दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्रातील बंद धार्मिक स्थळांचे दरवाजे नवरात्रोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर उघडली जाणार आहेत.म्हणजेच भक्तांना 7 ऑक्टोबरपासून मुंबई तसेच महाराष्ट्रभरातील सर्व देवस्थानांचे दर्शन घेता येणार आहे.मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात भाविकांना प्रत्यक्ष दर्शन घेता येणार आहे.(Temple bells to be rung in Mumbai; Rules drawn up for Siddhivinayaka’s darshan)
विशेष बाब म्हणजे नवरात्रीच्या सणामध्ये संपूर्ण देशात कोरोनाच्या संकटाची खबरदारी लक्षात घेऊन राज्य सरकारांनी काही नियम तयार केले आहेत.
भक्तांना मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात प्रवेश करण्यासाठी आधी बुकिंग करावे लागेल. यानंतर ते क्यूआर कोडद्वारे मंदिरात प्रवेश करू शकणार आहेत. मंदिर ट्रस्टने सूचित केले आहे की दर तासाला 250 भक्तांना क्यूआर कोड दिले जातील व भाविकांना कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर शिर्डी साई बाबा आणि शनि शिगणापूर मंदिरांचे द्वार उघडण्यात येणार आहेत. या मंदिरांमध्ये ही भाविकांना पास देण्यात येणार आहेत.ऑनलाईन पास असणाऱ्या किमान 15 हजार लोकांना दररोज शिर्डीला जाण्याची परवानगी असेल.मुंबईचे मुंबा देवी मंदिरही 7 ऑक्टोबरपासून उघडणार आहे.परंतु ज्या लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.मंदिरांमध्ये फुले, हार आणि प्रसाद घेऊन जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
ननवरात्रोत्सवात मुंबईत गरबा खेळण्यावर बंदी घातली आहे. तसेच दुर्गा देवीच्या मूर्तीची उंची मर्यादित असेल.सामुदायिक मंडळे चार फुटांच्या मूर्तीची स्थापना करू शकतील. तर घरात स्थापन होणाऱ्या मूर्तींची उंची दोन फूट असणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.यासह, 7 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी एसओपी देखील जारी करण्यात आला आहे.महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सप्टेंबरमध्ये टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीत घेतला होता.
हे ही वाचा :