आपलं शहरफेमस

Mumbai Theme Park : किडझानिया मुंबईतील सुप्रसिद्ध थीम पार्क;पहा का आहे खास…

किडझानिया मुंबई हे एक जागतिक इनडोअर थीम पार्क आहे.

Mumbai Theme Park : मुंबईत तुम्ही अनेक स्थळ पाहिले असतील,परंतु लहान मुलांच्या मनोरंजनाचे काय?हल्लीची सर्व मुले मोबाईलमध्ये व्यस्त असतात,बाहेरील जगात काय चालले आहे.याची त्यांना थोडीही जाणीव नसते,त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर ही परिणाम होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलांना काही नवीन गोष्टी दाखवायच्या असतील व त्यांना मोबाईलच्या दुनियेतून बाहेरच जग दाखवायचे असेल,तर नक्कीच भेट द्या मुंबईतील प्रसिद्ध किडझानिया या ठिकाणाला जे लहान मुलांसाठी एक उत्तम थीम पार्क आहे.(Kidzania is a well-known theme park in Mumbai; see why it is special …)

किडझानिया मुंबई हे एक जागतिक इनडोअर थीम पार्क आहे.येथे 4 ते 16 वयोगटातील मुलांना प्रवेश दिला जातो.किडझानिया थीम पार्कमध्ये मुलांचे सामाजिक आणि संज्ञानात्मक कौशल्य वाढवण्यासाठी मदत होते.हे ठिकाण कौटुंबिक मनोरंजन केंद्र आहे.किडझानिया हे पार्क ऑगस्ट 2013 मध्ये बांधले गेले असून किडझानिया मुंबईमधील व भारतातील पहिले थीम पार्क आहे. व हे जगातील 14 वे किडझानिया थीम पार्क आहे.

हे इनडोअर थीम पार्क केवळ मुलांसाठी बनवले गेले आहे. ज्यात वास्तविक शहरासारख्या वातावरणात भूमिका साकारण्याची अनोखी संकल्पना आहे.येथे लहान मुलांच्या मनोरंजनासाठी विविध प्रकारचे गेम्स आहेत.येथे पालकांसाठी लाऊंज आहे,जेथे ते आराम करू शकतात, जिथून ते टीव्ही स्क्रीनवर त्यांच्या मुलांचे निरीक्षण करू शकतात.

किडझानिया थीम पार्क हे मुंबईतील आर सिटी मॉल, घाटकोपर पश्चिम येथे आहे.हे थीम पार्क मंगळवार ते शुक्रवार पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत खुले असते.शनिवारी आणि रविवारी हे पार्क सकाळी 10 ते 3 व दुपारी 4 ते 9 वाजेपर्यंत खुले असते.सोमवारी हे थीम पार्क बंद ठेवले जाते.येथे जाण्यासाठी वयोगटानुसार शुल्क आकारले जाते.किडझानिया पार्क लहान मुलांना तर आकर्षित करतेच,मोठी माणसेही या पार्कला आवर्जून भेट देतात.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments