
Navratri festival rules : मुंबई ,महाराष्ट्र व संपूर्ण भारतभर आता लवकरच नवरात्रोत्सवाची धूम सर्वत्र पाहायला मिळेल,परंतु मुंबईमध्ये नवरात्रोत्सवावर BMC ने कोरोना महामारीमुळे काही निर्बंध घातले आहेत.त्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मुंबईतील रहिवाशांना व दुर्गा देवी मंडळांना केले आहे.(Almost Navratri festival in Mumbai, but BMC issues rules due to corona)
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) गुरुवारी सांगितले की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आगामी नवरात्रोत्सवामध्ये गरबा कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी दिली जाणार नाही.तसेच,BMC ने सामुदायिक मंडळांसाठी जास्तीत जास्त चार फूट उंचीच्या दुर्गा देवीच्या मूर्ती आणि घरगुती स्तरावर दोन फूट उंच मुर्तीची परवानगी देण्यात आली आहे.
कोरोना महामारीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन, BMC ने मुंबईकरांना कोरोनासंबंधित सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.नवरात्रोत्सव हा सण देखील अगदी साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. 7 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवासाठी BMC ने मानक कार्यप्रणाली
व काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
BMC च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सार्वजनिक मंडळांना पंडालमध्ये दुर्गा देवीची मूर्ती बसवण्यापूर्वी महामंडळाकडून ऑनलाईन पद्धतीने परवानगी घ्यावी लागणार आहे,त्यानंतर पंडालमध्ये देवीची स्थापना करण्यात यावी.
मुंबई | घरगुती मूर्तींसाठी मूर्तींची उंची 2 फूट आणि सार्वजनिक मंडळांसाठी 4 फूट असावी. मंडळांनी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. मंडळांमध्ये पाच लोकांना परवानगी. सार्वजनिक मंडळांमध्ये भाविकांसाठी फुले, मिठाईवर बंदी. मंडळांमध्ये स्वच्छता अनिवार्य: नवरात्रीसाठी बीएमसी एसओपी
– ANI (@ANI) 30 सप्टेंबर 2021
हे ही वाचा: