खूप काही

NCB Deputy DG : राष्ट्रवादीच्या आरोपांना उत्तर देणारे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह कोण आहेत?

या आरोपांना प्रतिउत्तर देण्यासाठी NCB चे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली होती.

NCB Deputy DG : NCB चे डेप्युटी डीजी ज्ञानेश्वर सिंह सध्या मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरण हाताळत आहेत.या प्रकरणावरून NCB वर राष्ट्रवादींकडून अनेक आरोप केले जात आहेत.या आरोपांना प्रतिउत्तर देण्यासाठी NCB चे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली होती.त्या पत्रकार परिषदेत NCB ने या आरोपांचा प्रतिकार केला आहे. NCB चे उपमहानिर्देशक ज्ञानेश्वर सिंह म्हणाले की, जर त्यांना (राष्ट्रवादी) न्यायालयात जायचे असेल तर ते जाऊन न्याय मागू शकतात.आम्ही तिथे उत्तर देऊ. आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही सिंह म्हणाले.(Who is the Deputy Director General Dnyaneshwar Singh?)

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी NCB वर आरोप केला आहे.की भाजपच्या सहकार्याने ही कारवाई केली जात आहे. यावर NCB ने सांगितले की,आमच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही.या प्रकरणात NCB ने माहितीच्या आधारावर आंतरराष्ट्रीय कॉर्डिलिया जहाजावर छापा टाकून 8 जणांना ताब्यात घेतले व तेथून कोकेन, चरस, एमडीएमए सारख्या विविध प्रकारचे ड्रग्ज जप्त केले आहे. अशी माहिती डेप्युटी डीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

डेप्युटी डीजी सिंह म्हणाले की, NCB पुन्हा सांगते की आम्ही करत असलेली कारवाई ही व्यावसायिक आणि कायदेशीररित्या योग्य व निष्पक्ष आहे.यापुढेही असेच असेल.तसेच सिंह म्हणाले की, NCB वर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत.हे आरोप द्वेष आणि पूर्वग्रहाने प्रेरित झाले आहे.

कोण आहेत ज्ञानेश्वर सिंह

ज्ञानेश्वर सिंह हे हिमाचल कॅडरचे 1999 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ज्ञानेश्वर सिंह यांची केंद्र सरकारने प्रतिनियुक्तीच्या आधारावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ( NCB ) मध्ये उपमहासंचालक म्हणून नियुक्ती केली होती.म्हणून आता NCB चे डेप्युटी डीजीचे पदभार ज्ञानेश्वर सिंह हे सांभाळत आहेत.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments