फेमस

Nehru Science Center : म्हणून नेहरू विज्ञान केंद्राला पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव दिले…

1977 मध्ये, या परस्परसंवादी विज्ञान केंद्राची सुरुवात “लाइट आणि साईट” प्रदर्शनाने झाली होती.

Nehru Science Center :तुम्हाला जर विज्ञान विषय आवडत असेल किंवा नसेलही आवडत, परंतु जर तुम्हाला या विषयात रुची निर्माण करायची असेल तर मुंबईतील प्रसिद्ध नेहरू सायन्स सेंटरला नक्की भेट द्या. येथे शिकण्यासारखे व विज्ञानाविषयी जाणून घेण्यासाठी खूप काही आहे. हे केंद्र त्याच्या वैज्ञानिक प्रदर्शनांसाठी व शैक्षणिक क्रियाकलापांसाठी खूप प्रसिद्ध आहे. हे भारतातील सर्वात मोठे परस्पर विज्ञान केंद्र आहे. यात व्हर्च्युअल हार्प, नेल सीट व जायंट हार्ट यासह सुमारे 500 प्रकारचे प्रदर्शन आहेत.(That is why the Nehru Science Center was named after Pandit Jawaharlal Nehru …)

नेहरू विज्ञान केंद्राचा इतिहास

नेहरू सायन्स सेंटर हे मुंबईतील वरळी येथे 1977 मध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाला समर्पित संग्रहालय म्हणून स्थापन करण्यात आले होते. या केंद्राचे नाव भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावरून ठेवण्यात  आले आहे.

1977 मध्ये, या परस्परसंवादी विज्ञान केंद्राची सुरुवात “लाइट आणि साईट” प्रदर्शनाने झाली होती. तर पुढे 1979 मध्ये येथे सायन्स पार्क बांधण्यात आले. नोव्हेंबर 1985 मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते नेहरू विज्ञान केंद्र जनतेसाठी खुले करण्यात आले.

नेहरू विज्ञान केंद्र का आहे खास

या केंद्रात विज्ञानाच्या विविध संकल्पना सोप्या व साध्या सरळ भाषेत समजून घेता येतात. तसेच येथे मुलांसाठी विज्ञान उद्यान साकारलेले आहे. केंद्रात शिरताक्षणीच उजव्या बाजूला उद्यान आहे, तर डाव्या बाजूला रेल्वेचे वाफेचे इंजिन आहे. पुढे ट्रामचा डबा, हवाई दलाचे विमान आहे. या केंद्रात विविध शास्त्रांज्ञानांचे पुतळे देखील पाहायला मिळतील. तर येथे 180 अंशातील डोम थिएटरमध्ये विज्ञानपट दाखविला जातो. प्रकाश, ध्वनी, वास, स्पर्श, चव अश्या ज्ञानेंद्रियांशी निगडित अनेक विज्ञान प्रयोग येथे आहेत.

नेहरू विज्ञान केंद्र येथे भेट देणाऱ्यांसाठी अनेक वैज्ञानिक प्रयोग, त्रिमितीय विज्ञान शो, तारांगण, आकाशदर्शन, सेमिनार, कार्यशाळा आणि वैज्ञानिक बैठका असे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. वैज्ञानिक विषयांशी संबंधित हजारो पुस्तके व शेकडो चित्रपटांसह येथे एक लायब्ररी देखील आहे.

नेहरू सायन्स सेंटर हे मुंबईतील डॉ ई मोसेस रोड, 4 सीझन्स हॉटेलसमोर, वरळी येथे स्थित आहे. नेहरू विज्ञान केंद्र हे पर्यटकांसाठी सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खुले असते. दिवाळी व होळी वगळता हे वर्षभर लोकांसाठी खुले असते. रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही तुम्ही नेहरू विज्ञान केंद्राला भेट देऊ शकता. परंतु लायब्ररी फक्त आठवड्याच्या दिवसात सकाळी 10 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत खुली असते.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments