फेमस

Powai Lake : पवई तलाव का आहे इतके खास? पहा काय आहेत त्याची वैशिष्ट्य…

सुंदर व कृत्रिम पवई तलाव 12 मीटर खोल व 6.6 किमीवर पसरलेला असून हे आयआयटी बॉम्बे तलावाच्या पूर्वेला वसलेले आहे.

Powai Lake :   मुंबई हे शहर त्याच्या तलावांसाठी देखील ओळखले जाते. मुंबवतील प्रसिद्ध असलेले तलाव म्हणजे पवई तलाव. सुंदर व कृत्रिम पवई तलाव 12 मीटर खोल व 6.6 किमीवर पसरलेला असून हे आयआयटी बॉम्बे तलावाच्या पूर्वेला वसलेले आहे. पवई तलाव हे पर्यटकांसाठी एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे.(Why is Powai Lake so special?  See what’s featured …)

पवई तलावाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबईतील तीन तलावांपैकी पवई तलाव हा सर्वात प्रसिद्ध तलाव आहे.  मुंबईतील हे एक उत्तम निसर्गरम्य ठिकाण आहे. या तलावातून मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा केला जातो. तर तलावाच्या बाजूलाच जलशुद्धीकरण प्रकल्प देखील आहे. हे तलाव राष्ट्रीय उद्यानाचाच एक भाग असल्यामुळे याच्या एका बाजूला हिरवीगार झाडे व एक टेकडी आहे. ज्याचे रुपांतर आता आंबेडकर उद्यान असे करण्यात आले आहे.

पवई तलाव हे सुंदर गुलाबी-जांभळ्या बाल्सम झुडूपांसाठी देखील प्रसिद्ध आहे. ही झुडपे इतकी सुंदर आहेत की ते सर्व पर्यटकांना आकर्षित करतात. तसेच येथे सनबर्ड्स, किंगफिशर, पतंग, बुलबुल, बगळे, बदके, पॅराकीट्स, करकोचे आणि कबूतर अशा विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. ज्यांना निसर्गाविषयी अधिक जाणून घायचे असते असे निसर्गप्रेमी या तलावाकडे नेहमी गर्दी करत असतात. तसेच येथे कधी कधी मगरीचं दर्शन देखील होत असतं.

पवई तलावाला लागूनच  विस्तीर्ण असे पवई गार्डन ही आहे. येथे लोक मोठ्या संख्येने येत असतात. हे गार्डन देखील त्याच्या शांततेसाठी प्रसिद्ध आहे. या गार्डनमध्ये लहान मुलांच्या मनोरंजनासाठी अनेक प्रकारचे पाळणे ही आहेत.

मुंबईतील हे प्रसिद्ध ठिकाण पवई व्हॅली, मुंबई येथे स्थित असून हे पर्यटकांसाठी सर्व दिवस खुले असते. पवई गार्डन सकाळी 6 ते सकाळी 10 पर्यंत आणि दुपारी 1 ते 7 वाजेपर्यंत खुले असते. येथे प्रवेश करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments