
Praveen Tevatia : मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याची भीषणता तर सगळ्यांनाच माहीत असेल,पण दाहशदवाद्यां विरुद्धात लढाईत भारतीय सैन्यदलातील प्रवीण तेवतीया यांनी अवघ्या 23 वर्षाच्या वयात देशासाठी एक उत्तम कामगिरी केली.प्रवीण तेवतीया हे तरुणांसाठी एक प्रेरणा आहेत.चला तर जाणून घेऊया,प्रवीण तेवतीया यांनी 23 वर्षाच्या वयापासून ते आतापर्यंत केलेली कामगिरी व का ठरले तरुणांसाठी एक आदर्श.(Awaliya, a thrilling story that saved the lives of 185 people at the age of 23)
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना हरवण्यासाठी बुलंदशहर गावातील रहिवासी मरीन कमांडो प्रवीण कुमार तेवतीया यांची मोठी भूमिका होती.प्रवीण तेवतीया यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता, मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यातून तब्बल 185 लोकांचे प्राण वाचवले होते. त्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढतावेळी त्यांना अनेक गोळ्याही लागल्या होत्या.त्या गोळ्या त्याच्या फुफ्फुसामध्ये लागल्याने फुफ्फुसामध्ये छेद झाला आहे. तसेच दहशतवाद्यांचा सामना करताना त्यांना आपले एक कानही गमवावे लागले. परंतु त्यांनी हार न मानता ते दहशतवाद्यांशी लढत राहिले होते.
मरीन कमांडो प्रवीण तेवतीया हे 2017 मध्ये नौदलातून निवृत्त झाले.त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना शौर्य चक्र पुरस्कार देण्यात आले आहे.तसेच प्रवीण तेवतीया हे मॅरेथॉन धावपटू देखील आहेत. त्यांनी जगभरातील अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेऊन पदके जिंकली आहेत. प्रवीण यांनी 2015 मध्ये मुंबई मॅरेथॉन, 2016 मध्ये मुंबई हाफ मॅरेथॉन, 2017 मध्ये जयपूर आणि गोवा ट्रायथलॉन मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता.तर सप्टेंबर 2017 मध्ये लडाख येथे 72 किलोमीटर लांब खारदुंगला मॅरेथॉन त्यांनी पूर्ण केली होती. अशा अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतला आहे.
प्रवीण तेवतीयाने आयर्न मॅन ही पदवी देखील जिंकली आहे. प्रवीण यांनी त्यांच्या गावाबरोबर देशाची मान वर केली आहे.प्रवीणने देशातील लहान-मोठ्या अनेक स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवला आहे.व त्या स्पर्धांमध्ये अनेक मूल्यवान पदके जिंकली आहेत.तसेच प्रविनने कोरोना महामारीपासून देशाला मदत करण्यासाठी 35 पेक्षा जास्त पदकांचा ऑनलाइन लिलाव सुरू केला आहे.आतापर्यंत दोन पदके विकली गेली आहेत.यातून मिळालेले पैसे प्रवीण याने पीएम केअर फंडाला दिले आहेत.
रिटायर्ड मरीन कमांडो श्री प्रवीण तेवतिया ने अपने मेडल बेचकर पीएम केयर फंड में जमा कराये दो लाख रूपये। pic.twitter.com/oE6HZJUiwl
— BJP Delhi (@BJP4Delhi) July 20, 2020
हे ही वाचा :