खूप काहीफेमस

Queen’s Garden : पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी,मुंबईतील प्रसिद्ध राणीबाग या दिवसापासून खुले…

वीरमाता जिजाबाई उद्यान व प्राणीसंग्रहालय हे 1 नोव्हेंबरपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे.

Queen’s Garden :  कोरोना महामारीमुळे मुंबईतील अनेक प्रसिद्ध स्थळ बंद ठेवण्यात आले होते. परंतु ही परिस्थिती पुन्हा आपल्या वाटेवर येत असताना मुंबईतील अनेक पर्यटन स्थळांचे दरवाजे पर्यटकांसाठी खोलले जात आहेत. असच एक  मुंबईतील भायखळा येथील प्रसिद्ध ठिकाण म्हणजे  वीरमाता जिजाबाई उद्यान व प्राणीसंग्रहालय हे 1 नोव्हेंबरपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे.  अशी घोषणा गुरुवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC)  केली.(Good news for tourists, the famous Ranibagh in Mumbai is open from this day …)

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये नागरी संस्थेने वीरमाता जिजाबाई उद्यान व प्राणीसंग्रहालय एप्रिलमध्ये बंद केले होते.  परंतु आता BMC ने जारी केलेल्या एका अधिसूचनेनुसार, प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खुले असणार आहे.

तर अभ्यासक सकाळी 6 ते रात्री 8.30 या वेळेत परिसरात प्रवेश करू शकणार आहेत.  राणीचा बाग म्हणून ओळखले जाणारे प्राणीसंग्रहालय हे विविध प्रकारचे प्राणी, विदेशी पक्ष्यांच्या विविध प्रजाती,  विविध वनस्पती  यांचे घर आहे. या आकर्षक व सुंदर वीरमाता जिजाबाई उद्यान व प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी 1 नोव्हेंबर पासून खुले होणार आहे.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments