आपलं शहरफेमस

Rajabai Clock Tower : मुंबईतील राजाबाई क्लॉक टॉवर का आहे खास;पहा त्याचा इतिहास…

हा टॉवर 85 मीटर उंच असून,ते मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये स्थित आहे. तुम्ही ही भव्य वास्तू पाहिली आहे का?

Rajabai Clock Tower :  मुंबई हे धावपळीचे शहर असले,तरी मुंबईतील ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी तुम्ही एक दिवस तरी रजा घेतली पाहिजे. मुंबईत अनेक प्रेक्षणीय स्थळे,वास्तू आहेत. अशीच एक वास्तू म्हणजे मुंबईत भव्यपणे उभे असलेले ‘राजाबाई क्लॉक टॉवर’. हा टॉवर 85 मीटर उंच असून,ते मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये स्थित आहे. तुम्ही ही भव्य वास्तू पाहिली आहे का?या भव्य राजाबाई क्लॉक टॉवरलाला तुम्ही एकदा नक्की भेट द्यायला हवी आणि त्याचे निरीक्षण करायला हवे .(Why Rajabai Clock Tower in Mumbai is special; see its history …)

19 व्या शतकातील कॉटन किंग व मुंबईचे बुलियन किंग प्रेमचंद रॉयचंद यांनी मुंबईतील राजाबाई क्लॉक टॉवर बांधण्याचा संपूर्ण खर्च उचलला होता. तसेच या टॉवरचे नाव त्यांच्या आईच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.

ब्रिटीश शिल्पकार सर जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट यांनी टॉवरची रचना केली होती. 1869 मध्ये या टॉवरच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती, तर 1878 साली राजाबाई क्लॉक टॉवरचे बांधकाम पूर्ण झाले. टॉवरची व्यवस्थितपणे देखरेख केली जात नसल्याने कालांतराने या टॉवरची चमक कमी होऊ लागली होती,परंतु 2013-2015 दरम्यान त्याची नियोजित पुनर्स्थापना करण्यात आली.

आज, टॉवर मुंबई विद्यापीठाच्या परिसरात भव्यपणे उभा असल्याचे पाहायला मिळते. तर पर्यटक ही वास्तू पाहण्यासाठी येथे भेट देत असतात. राजाबाई क्लॉक टॉवर जीर्णोद्धार प्रकल्पाला 2018 मध्ये सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी युनेस्को एशिया-पॅसिफिक पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. तसेच राजाबाई क्लॉक टॉवरमध्ये 24 पुतळे आहेत, जे ब्रिटिश राजवटीतील सामान्य भारतीय लोकांच्या जीवनाचे चित्रण करतात.

मुंबईतील हे भव्य राजाबाई क्लॉक टॉवर कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग, मंत्रालय, किल्ला , येथे स्थित आहे. राजाबाई क्लॉक टॉवरच्या सौंदर्याची प्रशंसा करण्यासाठी व त्याची छायाचित्रे क्लिक करण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. हे सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत खुले असते.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments