आपलं शहरखूप काही

Superfast Train : मुंबईत या दोन ट्रेन धावणार सुपरफास्ट;परंतु मोजावे लागणार अतिरिक्त पैसे

तर या गाड्यांना सुपरफास्ट बनवण्यासाठी त्यांचे क्रमांक बदलण्याचे आदेश रेल्वेने दिले आहेत.

Superfast Train : मुंबईतील रेल्वे प्रवाशांना वांद्रेला जाण्यासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत,कारण वांद्रेतील दोन रेल्वे गाड्या आता सुपरफास्ट होणार आहेत, तर या गाड्यांना सुपरफास्ट बनवण्यासाठी त्यांचे क्रमांक बदलण्याचे आदेश रेल्वेने दिले आहेत.(These two trains will run superfast in Mumbai, but will have to pay extra)

वास्तविक, रेल्वे लखनौ जंक्शन वांद्रे एक्स्प्रेस स्पेशल व गाझीपूर वांद्रे स्पेशल ट्रेन लखनौ येथून चालवली जाते. या एक्स्प्रेस गाड्या सामान्य भाडे आकारतात.तर नोव्हेंबरपासून रेल्वेने 09021 वांद्रे टर्मिनस – लखनौ जंक्शन स्पेशलला नियमित सुपरफास्ट स्पेशल म्हणून नवीन नंबर 20921 व 09022 लखनौ जंक्शन – वांद्रे टर्मिनस स्पेशल नवीन नंबर 20922 देण्यात आले आहेत. या गाड्यांचे क्रमांक बदलवण्यात आले असून त्यांना सुपरफास्ट बनवले आहे.

दुसरीकडे ट्रेन 09041 वांद्रे टर्मिनस – गाझीपूर सिटी नवीन नंबर 20941 वरून 09042 गाजीपूर सिटी – वांद्रे टर्मिनस 20942 क्रमांकावरून धावेल. यामुळे जनरल क्लास ते एसी फर्स्ट पर्यंतचे भाडे आता जास्त आकारले जाणार आहे. या दोन्ही ट्रेनमध्ये प्रवाशांना आता सेकंड सिटिंग वर्गासाठी 15 रुपये, स्लीपर क्लाससाठी 30 रुपये, एसी थर्डसाठी 45 रुपये, एसी सेकंडसाठी 45 रुपये आणि एसी फर्स्टसाठी 75 रुपये असे अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.

सध्या लखनौ ते वांद्रे सेकंड सिटिंग वर्गाचे भाडे 395 रुपये, स्लीपर वर्गाचे 645 रुपये, एसी थर्डचे 1720 रुपये आणि एसी सेकंडचे 2495 रुपये आहे. आता या भाड्यासह, वर्गवार सुपरफास्ट शुल्क देखील भरावे लागणार आहे.लखनौ जंक्शन वांद्रे व गाझीपूर वांद्रे एक्सप्रेस स्पेशलच्या वेळापत्रकात एकही थांबा घेतला गेला नाही.या ट्रेनचा मुक्कामही पूर्वीसारखाच असणार आहे.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments