
The Queen’s Garden : मुंबईतील प्रसिद्ध व पर्यटकांच्या पसंतीचे उद्यान म्हणजे वीरमाता जिजाबाई भोसले पार्क आणि प्राणिसंग्रहालय हे आहे.हे उद्यान मुंबईच्या भायखळा परिसरातील नियमित पर्यटक व मुंबईकरांना नेहमीच आकर्षित करत असते. राणीच्या बागेत प्राणी आणि पक्षी पाहण्यासाठी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वचजण नेहमीच गर्दी करत असतात.(Good news for tourists, the Queen’s Garden will start soon)
कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी राणीचे बाग पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. परंतु, सध्या कोरोनाचा प्रसार सर्वत्र कमी होताना दिसत आहे,तर अनेक आर्थिक व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राणीच्या बागेचे प्रवेशद्वार लवकरच उघडण्याची शक्यता आहे.
कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत राणीच्या बागेत पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर रुग्णसंख्या कमी झाल्यावर सार्वजनिक उद्याने पर्यटकांसाठी खुली करण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये क्वीन्स गार्डनही पर्यटकांसाठी खुले करण्यात आले होते.राणीच्या बागेत पर्यटकांचीही चांगली गर्दी होत होती. परंतु पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने सर्व सार्वजनिक ठिकाणी प्रवेश बंदी करण्यात आली होती.
क्वीन्स गार्डनमधील जैवविविधता, वाघ, पँथर, अस्वल, पेंग्विन आणि इतर वन्यजीवांचे साक्षीदार होण्याची नवी संधी पर्यटकांना मिळण्याची शक्यता आहे. सध्या पर्यटकांना क्वीन्स गार्डनमध्ये प्रवेश नाही. मात्र,राज्य सरकार व महानगरपालिकेकडून आदेश येताच पर्यटकांना लवकरच राणीच्या बागेत प्राणी पाहण्याची संधी मिळणार आहे.राणीचे बाग उघडण्यापूर्वीच प्रशासनाने ही तयारी सुरू केली आहे.
सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. राज्य सरकार व महापालिकेने अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राणीचे बाग व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणे लवकरच पर्यटकांसाठी खुली होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :