फेमस

Aryan Khan Granted Bail : आर्यन खानला जामीन मिळण्यामागील 5 मोठी कारणे आली समोर…

Aryan Khan Granted Bail : अँटेलिया क्रुझवर ड्रग्ज घेऊन गेल्याचा आरोप शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यावर NCB ने केला होता. त्यामुळे आर्यन खानला चौकशीच्या कारणावरून तब्बल 25 दिवस कोठडीमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे फक्त मुंबई नाही, तर जगभरात चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या सगळ्या गोष्टींच्या मध्येच अनेक प्रयत्नांनंतर आर्यन खानला जामीन मिळाला, आता तो कसा मिळाला, त्यामागे नेमकी कारणे काय होती, याचाच आढावा आज आपण घेणार आहोत. (There are 5 main reasons why Aryan Khan was granted bail)

मुकुल रोहतगी यांचा युक्तिवाद

आर्यनचे वकील मुकुल रोहतगी यांनी आर्यनच्या सुटकेसाठी मुंबई उच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. “मी अरबाजसोबत गेलो होतो, त्याच्याकडे 6 ग्रॅम ड्रग्ज होते, ज्यामध्ये एनसीबीने एक कट म्हणून कमर्शियल मात्रा जोडली आहे, इतर पाच लोक जे करत आहेत, ते माझ्यावर लागू केले जात आहे. बोर्डात 1300 लोक होते. मात्र आमची चौकशी करण्यात आली, माझ्याकडे जे ड्रग्ज नव्हते, ते माझ्यावर लादण्यात आले, असा उलट युक्तीवाद वकील मुकुल रोहितगी यांच्याकडून करण्यात आला.

इतर आरोपींना जामीन

मुंबई क्रूझ शिप प्रकरणात आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासमोर मनीष राजगरिया आणि अवीन साहू यांना कोर्टातून जामीन मिळाला आहे. मनीष राजगरिया यांच्याकडे अमली पदार्थांचा ताबा दाखवण्यात आला होता, मात्र पंचनाम्याच्या प्रतीमध्ये राजगरिया यांच्याकडून गांजा सापडला नसून, तो सुरक्षा अधिकाऱ्याने दिल्याचे स्पष्ट झाले. त्याचवेळी अवीन साहूवर दोनदा प्रतिबंधित पदार्थ सेवन केल्याचा आरोप होता. अरबाज मर्चंटचे वकील अमित देसाई यांनी न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणातील दोन आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. ही लहान मुले आहेत, जी पार्टीसाठी आली होती, दोघांनाही कलम 29 नुसार अटक करण्यात आली होती. मात्र काहींना जामीन देण्यात आला आणि काहींना ताब्यात घेण्यात आल्याचा युक्तीवाद इथे महत्त्वाचा ठरला.

यापूर्वी कोणत्याही गुन्ह्यात सहभागी झालेला नाही

आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचे मागील क्राईम रेकॉर्ड्सही पाहण्यात आले होते. या तिघांचाही यापूर्वी कोणत्याही गुन्ह्यात सहभाग नसल्याचं समोर आलं. त्यामुळे न्यायालयाने इतर बाबी लक्षात घेऊन तिघांनाही जामीन मंजूर केला.

आर्यन 14 अटी मान्य करेल

हायकोर्टाच्या आदेशात आर्यन खानच्या जामिनासाठी 14 अटी घालण्यात आल्या होत्या. यामध्ये पोलिसांना कळवल्याशिवाय मुंबई सोडता न येणे, दर शुक्रवारी एनसीबीसमोर हजर राहणे, एक लाखाचा वैयक्तिक बाँड जमा करणे, पासपोर्ट सरेंडर करणे आणि अरबाज मर्चंटसारख्या मित्रांशी न बोलणे, असा नियम तिघांनाही पाळावा लागेल, अशा अटी हाय कोर्टाने घालून दिल्या आहेत.

समीर वानखेडे, नवाब मलिकांच्या प्रकरणापासून दूर

आर्यन खान आणि त्यांच्या वकिलांसह तीन आरोपींच्या वतीने, महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यातील आरोप आणि प्रतिआरोपांपासून स्वतः दूर असल्याचंही आर्यन खानच्या वतीने कोर्टत सांगण्यात आले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments