फेमस

Tikuji Ni Wadi : मुंबईतील टिकुजी-नी-वाडी पार्क, का पाडतो पर्यटकांना भुरळ…

परंतु असेच एक अनोखे व प्रसिद्ध असलेले मुंबईतील टिकुजी नी वाडी या पार्कला तुम्ही कधी भेट दिली आहे का?

Tikuji Ni Wadi : आजवर मुंबईतील अनेक वॉटरपार्कला तुम्ही भेटी दिल्या असतील,परंतु असेच एक अनोखे व प्रसिद्ध असलेले मुंबईतील टिकुजी नी वाडी या पार्कला तुम्ही कधी भेट दिली आहे का? हे एक मनोरंजन वॉटर पार्क आणि रिसॉर्ट आहे. हे ठिकाण कौटुंबिक सहलीसाठी खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. आपल्या बिजी शेड्युल मधून निदान एक दिवस काढून हे ठिकाण मौजमस्ती करण्यासाठी योग्य ठिकाण आहे.(Tikuji-Ni-Wadi Park in Mumbai, why it attracts tourists …)

हे रिसॉर्ट, जे एक करमणूक पार्क व वॉटर पार्क देखील आहे, हे पार्क त्याच्या सभोवतालचा शांत डोंगर व हिरव्यागार दऱ्यांसाठी ओळखले जाते.  मुंबईच्या वेड्या गर्दीपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेले टिकूजी-नी-वाडी हे 20 एकर क्षेत्रात पसरलेले कौटुंबिक मनोरंजन रिसॉर्ट आहे.

या पार्कमध्ये वेव्ह पूल पासून वॉटर राईड पर्यंत, जायंट व्हील ते गो-कार्ट, डायनासोर पार्क, या पार्कमध्ये स्लाइड, स्पिन कॅस्टर, रोलर कोस्टर, इत्यादी वॉटरपार्क राईड्स आहेत. या ठिकाणी विवाहमंडप आणि शिव मंदिर देखील आहे. शिवरात्री दरम्यान येथे बर्फाची एक विशाल शिव मूर्ती तयार केली जाते, त्यादरम्यानचे दृश्य अगदी नेत्रदीपुन टाकतात. या ठिकाणी गो कार्टिंग आणि 7 मजली झिप-लाइन देखील आहे. ज्यामुळे हे ठिकाण इतर वॉटर पार्कपेक्षा वेगळे आहे. येथे एक वास्तववादी डायनासोर पार्क देखील आहे, ते पार्क  2013 मध्ये बांधण्यात आले आहे.

हे दृश्ये, मनोरंजक सवारी व साहसी उपक्रमांसाठी देखील लोकप्रिय आहे. हे पार्क लहान मुलांनाच नाही, तर प्रौढांनाही आकर्षित करते. हे वॉटरपार्क वर्षभर खुले असते.  येथील रिसोर्ट  सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत खुले असते. तर मनोरंजन पार्कमध्ये सकाळी 11 ते संध्याकाळी 7 पर्यंत पर्यटकांना प्रवेश असतो. तसेच येथील वॉटर पार्क सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत खुले असते.

हे पार्क टिकुजी-नी-वाडी रोड समोर. टाटा पॉवर हाऊस मानपाडा, चितळसर, ठाणे , मुंबई येथे स्थित आहे. या पार्कमध्ये प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती 490 रुपये घेतले जाते.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments